WhatsApp आता ४० होऊन अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि Android वर साधारण ६० पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. सर्वसाधारणपणे, तुमच्या फोनवर जी भाषा सेट केलेली आहे तीच भाषा WhatsApp वापरते. जसे की, जर तुमच्या फोनची भाषा इंग्रजी सेट केलेली असेल तर WhatsApp इंग्रजीमध्येच असेल.
तुमच्या फोनची भाषा बदलण्यासाठी :
- Android: तुमच्या फोनवर येथे जा सेटिंग्ज > सिस्टीम > भाषा आणि इनपुट > भाषा येथे जा. त्यानंतर भाषा अग्रस्थानी आणण्यासाठी त्यावर टॅप करून होल्ड करा, किंवा भाषा समाविष्ट करा
वर टॅप करा.
- iPhone: iPhone Settings
> General > Language & Region > iPhone Language येथे जा. भाषा निवडा व Done > Change to {language} वर टॅप करा.
- Windows Phone: तुमच्या फोनवर Settings > Time & language > Language येथे जा. तुम्ही Add languages वर टॅप करू शकता किंवा भाषा अग्रस्थानी आणण्यासाठी त्यावर टॅप करून होल्ड करा आणि Move up वर टॅप करा. हे सर्व बदल दिसण्यासाठी तुम्हाला फोन बंद करून परत सुरू करावा लागेल.
- KaiOS: ॲप मेनू मधील सेटिंग्स वर जा आणि उजवीकडे स्क्रोल करून वैयक्तिकरण वर जा > खालील बाजूला स्क्रोल करून भाषा वर जा > भाषा वर प्रेस करा > तुम्हाला जी भाषा हवी आहे ती निवडा आणि ठीक आहे किंवा > निवडा वर प्रेस करा.
काही देशांसाठी इतर पर्याय देखील उपलब्ध आहे
तुम्ही जर Android फोन वापरत असाल तर तुम्ही WhatsApp मधूनही तुमची ॲप ची भाषा बदलू शकता. तसे करण्यासाठी:
- WhatsApp उघडा.
- अधिक पर्याय
> सेटिंग्ज > गप्पा >
> ॲपची भाषा येथे टॅप करा.
- पॉप अप दिसू लागल्यानंतर जी भाषा तुम्हाला निवडायची आहे ती निवडा.
टीप: जर तुम्हाला हा पर्याय उपलब्ध नसेल तर शक्यता आहे की तुमच्या देशात या फिचरला सपोर्ट नसेल.