तुम्ही तुमचा WhatsApp एसएमएस सत्यापन कोड इतरांशी शेअर करू नका, अगदी ते जवळचे मित्र किंवा नातेवाईक असले तरीही. तुम्ही तुमचा कोड शेअर करण्यासाठी भुलवले गेले असल्यास आणि त्यामुळे तुमचे WhatsApp खाते तुम्ही ॲक्सेस करू शकत नसल्यास तुमचे खाते परत मिळविण्यासाठी खालील सूचना वापरा.
जर तुम्हाला अशी शंका असेल की तुमचे WhatsApp खाते दुसरे कोणी वापरत आहे तर तुम्ही लगेचच तुमच्या नातेवाईकांशी व मित्रमैत्रिणींशी संपर्क साधून त्यांना याविषयी सूचित करा. कारण शक्यता आहे की ते तुम्ही समजून कोणा त्रयस्थ व्यक्तीशी संभाषण करत असतील. लक्षात घ्या की, WhatsApp हे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट केलेले आहे आणि संदेश हे तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेले असतात त्यामुळे जर कोणी तुमचे खाते ॲक्सेस करत असले तरी त्यांना तुमची जुनी संभाषणे दिसू शकत नाहीत.
तुमचा फोन नंबर वापरून WhatsApp मध्ये साइन इन करा आणि एसएमएस द्वारे प्राप्त झालेला ६ अंकी कोड वापरून तुमचा फोन नंबर सत्यापित करा. तुमचा फोन नंबर कसा सत्यापित करावा याविषयी अधिक आमच्या मदत केंद्रावरील लेखांमध्ये जाणून घ्या : Android | iPhone | Windows Phone.
तुम्ही एकदा ६ अंकी एसएमएस कोड प्रविष्ट केला की जे कोणी तुमचे खाते ॲक्सेस करत आहे ते आपोआप लॉग आऊट होतील.
तुम्हाला द्वी-स्तर पडताळणी कोड साठी देखील विचारले जाण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला हा कोड माहीत नसेल तर जे कोणी तुमचे खाते वापरत असेल त्यांनी द्वी-स्तर पडताळणी सक्षम केली असेल. द्वी-स्तर पडताळणी शिवाय साइन इन करण्यासाठी तुम्हाला ७ दिवस वाट बघणे गरजेचे आहे. जरी तुम्हाला हा सत्यापन कोड माहीत असो व नसो तरी तुम्ही एकदा ६ अंकी एसएमएस कोड एंटर केला की ती व्यक्ती तुमच्या खात्यामधून लॉग आऊट होते. द्वी-स्तर पडताळणी बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.