मूलभूतरित्या, गटातील कोणताही सदस्य गट विषय, गट वर्णन बदलू शकतात किंवा संदेश पाठवू शकतात. तथापि, गट अॅडमीन फक्त अॅडमीनला गट माहिती संपादित करण्याची किंवा संदेश पाठवण्याची अनुमती देण्यासाठी गट सेटिंग्ज बदलू शकतो.
गट सेटिंग बदलणे
गट माहिती संपादित करण्याकरिता गट सेटिंग्ज बदलण्यासाठी :
- WhatsApp मधील गटामध्ये जा नंतर गट विषयावर टॅप करा.
- वैकल्पिकरित्या, गप्पा टॅब मधील गटावर जास्तवेळ दाबून ठेवा > गट माहिती वर टॅप करा.
- गट सेटिंग्ज > गट माहिती संपादित करा वर टॅप करा.
- गट माहिती संपादित करण्यासाठी सर्व सहभागी किंवा केवळ अॅडमीन ला अनुमती देण्याची निवड करा.
संदेश पाठविण्याकरिता गट सेटिंग्ज बदलण्यासाठी :
- WhatsApp मधील गटामध्ये जा नंतर गट विषयावर टॅप करा.
- वैकल्पिकरित्या, गप्पा टॅब मधील गटावर जास्तवेळ दाबून ठेवा > गट माहिती वर टॅप करा.
- गट सेटिंग्ज > संदेश पाठवा वर टॅप करा.
- संदेश पाठवण्यासाठी सर्व सहभागी किंवा केवळ अॅडमीन ला अनुमती देण्याची निवड करा.
टीप * : गटामध्ये *अॅडमीनवर टॅप करून नंतर त्यांना संदेश पाठवायचा असलेल्या अॅडमीनच्या नावावर टॅप करून सहभागी थेट अॅडमीनशी संपर्क साधू शकतात.
गट विषय बदलणे
विषय बदलण्यासाठी :
- WhatsApp मधील गटामध्ये जा नंतर गट विषयावर टॅप करा.
- वैकल्पिकरित्या, गप्पा टॅब मधील गटावर जास्तवेळ दाबून ठेवा > गट माहिती वर टॅप करा.
- विषय वर टॅप करा.
- नवीन विषय लिहा आणि स्वीकार करा
वर टॅप करा.
- विषय मर्यादा २५ कॅरॅक्टर्स इतकी आहे.
- तुम्ही इमोजी चिन्हावर क्लिक करून तुमच्या विषयामध्ये इमोजी समाविष्ट करू शकता.
गट चिन्ह बदलणे
गट चिन्ह बदलण्यासाठी :
- WhatsApp मधील गटामध्ये जा नंतर गट विषयावर टॅप करा.
- वैकल्पिकरित्या, गप्पा टॅब मधील गटावर जास्तवेळ दाबून ठेवा > गट माहिती वर टॅप करा.
- गट चिन्हावर टॅप करा.
- नवीन प्रतिमेसाठी फोटो घ्या, अल्बममधून निवडा किंवा वेबवर शोधा निवडा.
- तुम्हाला सध्याचे चिन्ह काढायचे असल्यास, काढा > काढा वर टॅप करा.
- तुम्ही नवीन चिन्ह सेट केल्यानंतर स्वीकार करा
वर टॅप करा.
गट वर्णन बदलणे
गट वर्णन बदलण्यासाठी :
- WhatsApp मधील गटामध्ये जा नंतर गट विषयावर टॅप करा.
- वैकल्पिकरित्या, गप्पा टॅब मधील गटावर जास्तवेळ दाबून ठेवा > गट माहिती वर टॅप करा.
- वर्णन वर टॅप करा.
- नवीन वर्णन लिहा आणि स्वीकार करा
वर टॅप करा.
- वर्णन मर्यादा ५१२ कॅरॅक्टर्स इतकी आहे.
गट अधिसूचना म्यूट करणे
काही ठराविक काळासाठी तुम्ही गट अधिसूचना म्यूट अर्थात त्यांचा ध्वनी बंद करू शकता. गटामध्ये आलेला संदेश तुम्हाला अजूनही प्राप्त होईल परंतु ते संदेश जेव्हा येतील तेव्हा फोन व्हायब्रेट होणार नाही किंवा आवाज होणार नाही. अधिसूचना म्यूट करण्यासाठी :
- WhatsApp मधील गटामध्ये जा नंतर गट विषयावर टॅप करा.
- पर्यायीपणे, Chats टॅब मधील गटावर जास्तवेळ दाबून ठेवा.
- म्यूट करा वर टॅप करा.
- तुम्हाला किती कालावधीसाठी अधिसूचना म्यूट करायच्या आहेत ते निवडा.
यांवर गटांमध्ये बदल कसे करायचे ते येथे जाणून घ्या : Android | iPhone | Nokia S40 | WhatsApp Web