तुम्हाला WhatsApp वेब वर नोटिफिकेशन्स मिळत नसतील, तर तुमच्या ब्राउझरमध्ये नोटिफिकेशन्स सुरू आहेत याची खात्री करा.
नोटिफिकेशन्स सुरू करणे
- तुमच्या ब्राउझरमध्ये, तुमच्या चॅट्सच्या यादीच्या वर असलेल्या निळ्या बॅनरमधील डेस्कटॉप नोटिफिकेशन्स सुरू करा वर क्लिक करा.
- त्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या सूचनांचे पालन करत जा.
टीप: निळे बॅनर दिसत नसल्यास पेज रिफ्रेश करा. तुम्हाला अजूनही बॅनर दिसत नसेल, तर तुम्ही तुमच्या WhatsApp सेटिंग्ज मध्ये नोटिफिकेशन्स म्यूट किंवा बंद केली असल्याची शक्यता आहे.
नोटिफिकेशन्स अनब्लॉक करणे
- तुमच्या ब्राउझरमध्ये Easy Setup आयकॉन > browser settings वर क्लिक करा.
- किंवा, Opera > Settings वर क्लिक करा.
- Advanced > Privacy & security > Site Settings > Notifications वर क्लिक करा.
- "https://web.whatsapp.com" Block यादीमध्ये असल्यास, त्याच्या बाजूचा More आयकॉन > Allow वर क्लिक करा.
तुम्ही "web.whatsapp.com" च्या बाजूच्या कुलूप चिन्हावर क्लिक करूनही हे करू शकता. नोटिफिकेशन्स च्या बाजूचा ड्रॉपडाउन Block वर सेट केलेला असेल तर तो बदलून Allow वर सेट करा.
संबंधित लेख :