मला पडताळणी अयशस्वी झाल्याची चेतावणी का दिसत आहे?
लोक वेबवर WhatsApp वापरतात, तेव्हा 'कोड व्हेरिफाय' एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनमध्ये सुरक्षेचा अतिरिक्त स्तर जोडते. तुम्ही 'कोड व्हेरिफाय' हे वेब ब्राउझर एक्स्टेंशन डाउनलोड केले असल्यास तुम्हाला “पडताळणी अयशस्वी झाली” अशी चेतावणी दिसू शकते. हे पुढील कारणांमुळे होऊ शकते:
- तुम्ही एखादे असे एक्स्टेंशन इंस्टॉल केले आहे, जे पेजची पडताळणी करण्याच्या आमच्या क्षमतेमध्ये हस्तक्षेप करत आहे.
- तुमच्या WhatsApp वेब पेजवर रन होत असलेला कोड इतर सर्वजण वापरत असलेल्या कोडशी जुळत नाही.
- आमच्याकडून काहीतरी चूक झाली.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी:
- तुमची इतर एक्स्टेंशन्स थांबवून पडताळणी प्रक्रिया पुन्हा करण्याचा प्रयत्न करा आणि ती पूर्ण झाल्यानंतर इतर एक्स्टेंशन्स पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करा. चेतावणी घालवण्यासाठी तुम्हाला WhatsApp वेब पुन्हा लोड करावे लागू शकते.
- या समस्येस Meta येथील इंजिनियरिंगच्या वेबसाइटवर किंवा Meta येथील इंजिनियरिंगच्या Twitter पेजवर सार्वजनिकरीत्या संबोधित केले गेले आहे का ते पहा.
- या गोष्टीला ज्ञात समस्या म्हणून संबोधित केले गेले नसल्यास, WhatsApp वेबवरून लॉग आउट करा आणि तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर WhatsApp वापरा, कारण तुमचे वेबवरील मेसेजेस यापुढे खाजगी राहणार नाहीत. तुम्हाला समस्येचा आणखी तपास करायचा असल्यास, अयशस्वी पडताळणीच्या लाल चेतावणीवर क्लिक करा आणि सोर्स कोड डाउनलोड करा.
संबंधित लेख:
- 'कोड व्हेरिफाय' विषयी माहिती
- मला नेटवर्क टाइमआउट एरर का दिसत आहे?
- मला संभाव्य धोक्याची चेतावणी का दिसत आहे?