मला संभाव्य धोक्याची चेतावणी का दिसत आहे?
लोक वेबवर WhatsApp वापरतात, तेव्हा 'कोड व्हेरिफाय' एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनमध्ये सुरक्षेचा अतिरिक्त स्तर जोडते. तुम्ही 'कोड व्हेरिफाय' वेब ब्राउझर एक्स्टेंशन डाउनलोड केले असल्यास, तुम्हाला “ब्राउझरवरील दुसऱ्या एक्स्टेंशनमुळे पडताळणी करू शकत नाही. इतर एक्स्टेंशन(न्स) थांबवून पुन्हा प्रयत्न करून पहा” अशी चेतावणी दिसू शकेल. हे पुढील कारणांमुळे होऊ शकते:
- तुम्ही एखादे असे एक्स्टेंशन इंस्टॉल केले आहे, जे पेजची पडताळणी करण्याच्या आमच्या क्षमतेमध्ये हस्तक्षेप करत आहे.
- तुमची इतर अॅक्टिव्ह ब्राउझर एक्स्टेंशन्स तुम्ही WhatsApp वेबवर पाहत असलेला आशय वाचू शकतात किंवा त्यामध्ये बदल करू शकतात. WhatsApp वेबवरील तुमच्या मेसेजेसच्या सुरक्षेची खात्री पटवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे या चेतावणीचे कारण असणारी कोणतीही एक्स्टेंशन्स बंद करणे.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी:
- तुमची इतर एक्स्टेंशन्स थांबवून पडताळणी प्रक्रिया पुन्हा करण्याचा प्रयत्न करा आणि ती पूर्ण झाल्यानंतर इतर एक्स्टेंशन्स पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करा. चेतावणी घालवण्यासाठी तुम्हाला WhatsApp वेब पुन्हा लोड करावे लागू शकते.
- एरर कायम राहिल्यास, पेज वापरत असताना खात्रीलायक वाटत नाहीत अशी एक्स्टेंशन्स बंद करा. चेतावणी घालवण्यासाठी तुम्हाला WhatsApp वेब पुन्हा लोड करावे लागू शकते.
- इतर अॅक्टिव्ह एक्स्टेंशन्सवर तुमचा विश्वास असल्यास, कोणतीही कृती आवश्यक नाही.
संबंधित लेख:
- 'कोड व्हेरिफाय' विषयी माहिती
- मला नेटवर्क टाइमआउट एरर का दिसत आहे?
- मला पडताळणी अयशस्वी झाल्याची चेतावणी का दिसत आहे?