मला नेटवर्क टाइमआउट एरर का दिसत आहे?
लोक वेबवर WhatsApp वापरतात, तेव्हा 'कोड व्हेरिफाय' एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनमध्ये सुरक्षेचा अतिरिक्त स्तर जोडते. तुम्ही 'कोड व्हेरिफाय' हे वेब ब्राउझर एक्स्टेंशन डाउनलोड केले असल्यास, तुम्हाला “नेटवर्क टाइम आउट. हे पेज सत्यापित करू शकत नाही” अशी चेतावणी दिसू शकते. हे पुढील कारणांमुळे होऊ शकते:
- तुमचे नेटवर्क कनेक्शन अस्थिर आहे.
- काहीतरी पेजच्या पडताळणीत व्यत्यय आणत आहे.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी:
- पेज पुन्हा लोड करा आणि एक्स्टेंशन पुन्हा उघडा.
- दुसऱ्या वायफाय नेटवर्कशी कनेक्ट करून पहा.
- तुमची इतर एक्स्टेंशन्स थांबवून पडताळणी प्रक्रिया पुन्हा करण्याचा प्रयत्न करा आणि ती पूर्ण झाल्यानंतर इतर एक्स्टेंशन्स पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करा. चेतावणी घालवण्यासाठी तुम्हाला WhatsApp वेब पुन्हा लोड करावे लागू शकते.
- चेतावणी कायम राहिल्यास, सावधगिरीने पुढे जा. WhatsApp वेबवरून लॉग आउट करण्याचा आणि तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर WhatsApp वापरून पाहण्याचा विचार करा, कारण तुमचे वेबवरील मेसेजेस यापुढे कदाचित खाजगी राहणार नाहीत.
संबंधित लेख:
- 'कोड व्हेरिफाय' विषयी माहिती
- मला संभाव्य धोक्याची चेतावणी का दिसत आहे?
- मला पडताळणी अयशस्वी झाल्याची चेतावणी का दिसत आहे?