कॅटलॉग किंवा बिझनेसची तक्रार कशी नोंदवावी
एखादा व्यवसाय आमच्या कॉमर्स पॉलिसीचे उल्लंघन करत असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्याची तक्रार नोंदवू शकता.
प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची तक्रार नोंदवणे
प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची तक्रार नोंदवण्यासाठी:
- बिझनेससोबतचे चॅट उघडा
- बिझनेसच्या नावासमोर असलेल्या
आयकॉनवर क्लिक करा - तपशील पाहण्यासाठी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवर क्लिक करा.
| आयकॉनवर आणि त्यानंतर तक्रार नोंदवा वर क्लिक करा.- तुमच्याकडे दोन पर्याय असतील:
- प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची तक्रार नोंदवण्यासाठी, तक्रार नोंदवा वर क्लिक करा.
- आणखी तपशील देण्यासाठी, आम्हाला आणखी सांगा वर क्लिक करा. नंतर, तुम्हाला हवा तो पर्याय निवडा आणि सबमिट करा वर क्लिक करा.
बिझनेसची तक्रार नोंदवणे
बिझनेसची तक्रार नोंदवण्यासाठी:
- त्या बिझनेसच्या WhatsApp Business प्रोफाइलवर जा
- अधिक पर्यायांसाठी, स्क्रीनच्या वरील बाजूस उजवीकडे असणाऱ्या
| आयकॉनवर क्लिक करा - बिझनेसची तक्रार नोंदवा वर क्लिक करा.
- तुमच्याकडे दोन पर्याय असतील:
- बिझनेसला ब्लॉक करण्यासाठी आणि त्याची तक्रार नोंदवण्यासाठी, बिझनेसला ब्लॉक करा आणि या चॅटमधील मेसेजेस हटवा च्या बाजूला असलेल्या चेक बॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर, तक्रार नोंदवा वर क्लिक करा
- बिझनेसची फक्त तक्रार नोंदवायची असल्यास, तक्रार नोंदवा वर क्लिक करा.