'कोड व्हेरिफाय' विषयी माहिती
लोक वेबवर WhatsApp वापरतात, तेव्हा 'कोड व्हेरिफाय' एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनमध्ये सुरक्षेचा अतिरिक्त स्तर जोडते.
तुम्ही Google Chrome, Mozilla Firefox आणि Microsoft Edge ब्राउझरच्या अधिकृत एक्स्टेंशन स्टोअर्सवरून 'कोड व्हेरिफाय' वेब ब्राउझर एक्स्टेंशन डाउनलोड करता, तेव्हा तुम्ही WhatsApp वेबची प्रमाणित व फेरफार न केलेली आवृत्ती वापरत आहात का याची पडताळणी एक्स्टेंशन आपोआप करते. यामुळे तुमचे मेसेजेस तुम्ही आणि फक्त तुमच्या प्राप्तकर्त्यांच्या दरम्यान राहतात व इतर कोणालाही ते वाचता येत किंवा ऐकता येत नाहीत याबद्दल तुम्ही खात्री बाळगू शकता. तुम्ही WhatsApp वेब रन करण्यासाठी वापरत असलेला कोड इतर सर्वजण वापरत असलेल्या कोडशी जुळत नसल्याचे एक्स्टेंशनला आढळल्यास, एक्स्टेंशन तुम्हाला तसे कळवते, जेणेकरून तुम्ही त्याबद्दल काहीतरी करू शकाल.
'कोड व्हेरिफाय' कसे वापरावे
वापरकर्त्याच्या सर्वोत्तम अनुभवासाठी, 'कोड व्हेरिफाय' ब्राउझर एक्स्टेंशन डाउनलोड केल्यानंतर ते तुमच्या टूलबारवर पिन केले असल्याची खात्री करा, जेणेकरून तुम्ही एक्स्टेंशन आणि त्याचे स्टेटस सहजरीत्या पाहू शकाल. तुम्ही WhatsApp वेब वापराल तेव्हा 'कोड व्हेरिफाय' आपोआप रन होईल (web.whatsapp.com). एक्स्टेंशन तुमच्या टूलबारवर पिन केल्यानंतर आणि WhatsApp वेबच्या कोडची पूर्णपणे पडताळणी केल्यानंतर, कोडची पूर्णपणे पडताळणी झाली आहे हे दाखवण्यासाठी एक्स्टेंशन हिरव्या वर्तुळामध्ये बरोबरची खूण दाखवेल.
एक्स्टेंशनला तुम्ही वापरत असलेल्या कोडची पडताळणी करता न आल्यास, तुम्हाला या तीन मेसेजेसपैकी एखादा मेसेज दिसेल:
- नेटवर्क टाइम आउट: नेटवर्क टाइम आउटमुळे तुमच्या पेजची पडताळणी होऊ शकत नसल्यास, तुमचे 'कोड व्हेरिफाय' एक्स्टेंशन नारिंगी वर्तुळामध्ये प्रश्नचिन्ह दाखवेल.
- संभाव्य धोका: एक किंवा अधिक एक्स्टेंशन्स पेज पडताळणी करण्याच्या आमच्या क्षमतेमध्ये हस्तक्षेप करत असल्यास, तुमचे 'कोड व्हेरिफाय' एक्स्टेंशन नारिंगी वर्तुळामध्ये प्रश्नचिन्ह दाखवेल.
- पडताळणी अयशस्वी: तुम्ही WhatsApp वेब रन करण्यासाठी वापरत असलेला कोड इतर सर्वजण वापरत असलेल्या कोडशी जुळत नसल्याचे एक्स्टेंशनला आढळल्यास, 'कोड व्हेरिफाय' आयकॉन लाल होईल आणि उद्गारवाचक चिन्ह दाखवेल.
तुमच्या टूलबारवरील 'कोड व्हेरिफाय' एक्स्टेंशन हिरवे, नारिंगी किंवा लाल असताना तुम्ही त्यावर क्लिक केल्यास, तुम्ही त्याबद्दल अधिक माहिती पाहू शकता आणि समस्या असल्यास, अधिक जाणून घ्या वर क्लिक करून त्या समस्येचे निराकरण कसे करावे हे जाणून घेऊ शकता. तुम्हाला या समस्येची आणखी तपासणी करायची असल्यास तुम्ही सोर्स कोडदेखील डाउनलोड करू शकता.
टीप:- 'कोड व्हेरिफाय' ब्राउझर एक्स्टेंशन हे फक्त WhatsApp वेबवरील मूलभूत कोड इतर सर्वजण वापरत असलेल्या कोडशी जुळत असल्याचे कन्फर्म करते. तुम्ही पाठवलेले किंवा तुम्हाला प्राप्त झालेले मेसेजेस एक्स्टेंशन वाचणार अथवा ॲक्सेस करणार नाही आणि तुम्ही एक्स्टेंशन डाउनलोड केले असल्यास आम्हाला ते कळणार नाही.
- 'कोड व्हेरिफाय' ब्राउझर एक्स्टेंशनचा परफॉर्मन्स तुम्ही वापरत असलेली इतर ब्राउझर एक्स्टेंशन्स थांबवण्यावर किंवा बंद करण्यावर आधारित असू शकतो.
- 'कोड व्हेरिफाय' ब्राउझर एक्स्टेंशन WhatsApp वेबसाठी कोडची पडताळणी करते. त्याचा WhatsApp डेस्कटॉपवर परिणाम होत नाही.
- एक्स्टेंशन कोणताही डेटा, मेटाडेटा किंवा वापरकर्ता डेटा लॉग करून घेत नाही आणि ते WhatsApp सोबत कोणतीही माहिती शेअर करत नाही. ते तुम्ही पाठवलेले किंवा प्राप्त केलेले मेसेजेस वाचत किंवा ॲक्सेसदेखील करत नाही.
संबंधित लेख:
- 'कोड व्हेरिफाय' हे वेब ब्राउझर एक्स्टेंशन कसे इंस्टॉल करावे
- मला नेटवर्क टाइमआउट एरर का दिसत आहे?
- मला संभाव्य धोक्याची चेतावणी का दिसत आहे?
- मला पडताळणी अयशस्वी झाल्याची चेतावणी का दिसत आहे?