डिव्हाइस कसे लिंक करावे
तुम्ही तुमचा फोन कनेक्ट न करता एकाच वेळी कमाल चार लिंक केलेल्या डिव्हाइसवर WhatsApp वापरू शकता. तुम्ही एका वेळी एकच फोन लिंक करू शकता.
डिव्हाइस लिंक करणे
तुम्हाला लिंक करायचे आहे त्या डिव्हाइसवर WhatsApp वेब किंवा डेस्कटॉप उघडा.
Android
- तुमच्या फोनवर WhatsApp उघडा.
- अधिक पर्याय
> लिंक केलेली डिव्हाइसेस यावर टॅप करा. - डिव्हाइस लिंक करा वर टॅप करा.
- तुमचा फोन अनलॉक करणे:
- तुमच्या डिव्हाइसमध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन असल्यास, स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा.
- तुमचे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरू नसल्यास, तुम्ही फोन अनलॉक करायला वापरता तो पिन एंटर करण्यास सांगितले जाईल.
- तुम्हाला लिंक करायचे आहे त्या डिव्हाइसच्या स्क्रीनवरील QR कोड स्कॅन करण्यासाठी फोन स्क्रीनवर धरा.
iPhone
- तुमच्या फोनवर WhatsApp उघडा.
- WhatsApp सेटिंग्ज वर जा.
- लिंक केलेली डिव्हाइसेस वर टॅप करा.
- डिव्हाइस लिंक करा वर टॅप करा.
- तुम्ही iOS 14 किंवा त्यावरील आवृत्ती असलेला फोन वापरत असल्यास तुमचा फोन अनलॉक करणे:
- अनलॉक करण्यासाठी टच आयडी किंवा फेस आयडी वापरा.
- तुमचे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरू नसल्यास, तुम्ही फोन अनलॉक करण्यासाठी वापरता तो पिन एंटर करण्यास सांगितले जाईल.
- तुम्हाला लिंक करायचे आहे त्या डिव्हाइसच्या स्क्रीनवरील QR कोड स्कॅन करण्यासाठी फोन स्क्रीनवर धरा.
टीप: सर्वोत्तम अनुभवासाठी, WhatsApp च्या नवीनतम आवृत्तीवर अपडेट करा.