WhatsApp वेब आणि डेस्कटॉप
तुम्ही तुमच्या काँप्युटरवर दोन प्रकारे WhatsApp वापरू शकता:
- WhatsApp वेब: WhatsApp चे ब्राउझरवर चालणारे ॲप्लिकेशन.
- WhatsApp डेस्कटॉप: कॉंप्युटरवर डाउनलोड करता येणारे ॲप्लिकेशन.
WhatsApp डेस्कटॉप आणि WhatsApp वेब ही तुमच्या फोनवरील WhatsApp खात्याची कॉंप्युटरवर चालणारी विस्तारित रूपे आहेत. तुम्ही पाठवता किंवा तुम्हाला मिळतात ते मेसेजेस तुमचा फोन आणि तुमचा कॉंप्युटर यांमध्ये सिंक केलेले असतात. तुमचे मेसेजेस तुम्ही दोन्ही डिव्हाइसवर पाहू शकता.