मीडिया फाइल्स कशा पाठवाव्यात
फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स किंवा संपर्क पाठवणे
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
- अटॅच करा
किंवा वर क्लिक करा, त्यानंतर येथे क्लिक करा: - फोटो आणि व्हिडिओ वर टॅप करून तुमच्या कॉंप्युटरवरून फोटो किंवा व्हिडिओ निवडा. तुम्ही एकावेळी कमाल ३० फोटो किंवा व्हिडिओ पाठवू शकता आणि प्रत्येक फोटो अथवा व्हिडिओला कॅप्शन जोडू शकता. किंवा, तुम्ही मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या जागेमध्ये फोटो किंवा व्हिडिओ थेट ड्रॅग करून ड्रॉप करू शकता. तुम्ही पाठवत असलेल्या प्रत्येक व्हिडिओ साइझची कमाल मर्यादा १६ MB इतकी आहे.
- कॅमेरा वर टॅप करून तुमच्या कॉंप्युटरचा कॅमेरा वापरून फोटो काढा.
- डॉक्युमेंट वर टॅप करून तुमच्या कॉंप्युटरवरून डॉक्युमेंट्स निवडा. किंवा तुम्ही मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या जागेमध्ये डॉक्युमेंट थेट ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता.
- संपर्क वर टॅप करून WhatsApp वरून तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह केलेल्या संपर्कांची माहिती पाठवा.
- पाठवा
किंवा वर क्लिक करा.
व्हॉइस मेसेज पाठवणे
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
- मायक्रोफोन
वर किंवा वर क्लिक करा आणि तुमच्या कॉंप्युटरच्या मायक्रोफोनमध्ये बोलण्यास सुरुवात करा. - बोलणे पूर्ण झाल्यावर व्हॉइस मेसेज पाठवण्यासाठी, कन्फर्म करा
वर क्लिक करा.
टीप: व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करत असताना तो रद्द करण्यासाठी तुम्ही रद्द करा
तुमच्या कॉंप्युटरवर फोटो किंवा व्हिडिओ सेव्ह करणे
- तुम्हाला सेव्ह करायचा आहे त्या फोटो किंवा व्हिडिओवर क्लिक करा.
- डाउनलोड करा
किंवा वर क्लिक करा. सूचना दिसल्यास, सेव्ह करा वर क्लिक करा.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर मीडिया फाइल्स कशा पाठवाव्यात: Android | iPhone | KaiOS