फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स, संपर्क किंवा Messenger रूम्स च्या लिंक्स पाठवणे
वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
अटॅच करा किंवा वर क्लिक करा, त्यानंतर येथे क्लिक करा:
फोटो आणि व्हिडिओ वर टॅप करून तुमच्या कॉंप्युटरवरून फोटो किंवा व्हिडिओ निवडा. तुम्ही एकावेळी कमाल ३० फोटो किंवा व्हिडिओ पाठवू शकता आणि प्रत्येक फोटो अथवा व्हिडिओला कॅप्शन जोडू शकता. किंवा, तुम्ही मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या जागेमध्ये फोटो किंवा व्हिडिओ थेट ड्रॅग करून ड्रॉप करू शकता. तुम्ही पाठवत असलेल्या प्रत्येक व्हिडिओ साइझची कमाल मर्यादा १६ MB इतकी आहे.
कॅमेरा वर टॅप करून तुमच्या कॉंप्युटरचा कॅमेरा वापरून फोटो काढा.
डॉक्युमेंट वर टॅप करून तुमच्या कॉंप्युटरवरून डॉक्युमेंट्स निवडा. किंवा तुम्ही मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या जागेमध्ये डॉक्युमेंट थेट ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता.
संपर्क वर टॅप करून WhatsApp वरून तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह केलेल्या संपर्कांची माहिती पाठवा.