तुमची नोटिफिकेशन्स कशी व्यवस्थापित करावीत
तुमच्या WhatsApp सेटिंग्ज मध्ये नोटिफिकेशन्सची प्राधान्ये सहज व्यवस्थापित करता येऊ शकतात.
WhatsApp वेब किंवा डेस्कटॉप उघडा > मेनू (
इथे तुम्ही पुढील गोष्टींमध्ये बदल करू शकता:
ध्वनी
डेस्कटॉप अलर्ट्स
पूर्वावलोकन दर्शवा
तुम्ही सर्व चॅट अलर्ट्स आणि ध्वनीदेखील ठरावीक काळासाठी बंद करू शकता. नोटिफिकेशन्स पुन्हा सुरू करण्यासाठी, अलर्ट आणि ध्वनी बंद करा वर क्लिक करा.रिस्टोअर करण्यासाठी (
वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट म्यूट करणे
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
- मेनू
> नोटिफिकेशन्स म्यूट करा यावर क्लिक करा. - किती कालावधीकरिता म्यूट केले जावे हे निवडा:
- ८ तास
- १ आठवडा
- नेहमी
- नोटिफिकेशन्स म्यूट करा वर क्लिक करा.
नोटिफिकेशन्स पुन्हा सुरू करण्यासाठी, म्यूट केलेले चॅट शोधा आणि मेनू
टीप: तुम्ही तुमच्या फोनवर वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट म्यूट केले असेल, तर ते WhatsApp वेब/डेस्कटॉपसाठी सुद्धा म्यूट होईल. बाकी सर्व नोटिफिकेशन सेटिंग्ज ही फोन आणि कॉंप्युटरवर स्वतंत्र असतात आणि त्यांचा एकमेकांवर परिणाम होत नाही.
सर्व नोटिफिकेशन्स म्यूट करा
इनकमिंग कॉल्सच्या नोटिफिकेशन्ससह सर्व नोटिफिकेशन्स म्यूट करण्यासाठी, WhatsApp वेब किंवा डेस्कटॉप बंद करा. डेस्कटॉप नोटिफिकेशन्स सुरू करण्यासाठी, WhatsApp उघडा.
किंवा, तुम्ही Mac वर 'व्यत्यय आणू नका' किंवा Windows वर 'फोकस असिस्ट' सुरू करू शकता. नोटिफिकेशन्स बंद कशी करावीत याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया Apple सपोर्ट वेबसाइट किंवा Microsoft सपोर्ट वेबसाइटला भेट द्या.