ग्रुपमध्ये बदल कसे करावेत
बाय डिफॉल्ट, ग्रुपमधील कोणताही सदस्य ग्रुपचे नाव, फोटो, वर्णन बदलू शकतो किंवा मेसेजेस पाठवू शकतो. तथापि, फक्त ॲडमीनला ग्रुप माहिती संपादित करण्याची अनुमती द्यायची असल्यास ग्रुप ॲडमीन ग्रुप सेटिंग्ज बदलू शकतो.
ग्रुपची माहिती बदलणे
ग्रुपचे नाव बदलणे
- WhatsApp ग्रुप चॅट सुरू करा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
- किंवा सर्वात वर कोपऱ्यात असलेल्या मेनूवर (
किंवा ) > ग्रुपची माहिती यावर क्लिक करा.
- किंवा सर्वात वर कोपऱ्यात असलेल्या मेनूवर (
- ग्रुपच्या नावाच्या उजवीकडील संपादित करा
वर क्लिक करा. - नवीन नाव एंटर करा त्यानंतर सेव्ह करण्यासाठी राखाडी बरोबरच्या खुणेवर
क्लिक करा.- ग्रुपच्या नावामध्ये जास्तीतजास्त २५ कॅरॅक्टर्स असू शकतात.
- तुम्ही इमोजी
चिन्हावर क्लिक करून तुमच्या ग्रुपच्या नावामध्ये इमोजी समाविष्ट करू शकता.
ग्रुपचा फोटो बदलणे
- WhatsApp ग्रुप चॅट सुरू करा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
- किंवा सर्वात वर कोपऱ्यात असलेल्या मेनूवर (
किंवा ) > ग्रुपची माहिती यावर क्लिक करा.
- किंवा सर्वात वर कोपऱ्यात असलेल्या मेनूवर (
- चिन्हावर कर्सर न्या, त्यानंतर ग्रुप फोटो बदला
वर क्लिक करा. - नवीन फोटो जोडण्यासाठी फोटो पहा, फोटो घ्या, फोटो अपलोड करा किंवा वेबवर शोधा यापैकी एक पर्याय निवडा किंवा फोटो काढा. Web Search हा पर्याय केवळ WhatsApp डेस्कटॉपवर उपलब्ध आहे.
ग्रुपची माहिती बदलणे
- WhatsApp ग्रुप चॅट सुरू करा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
- किंवा सर्वात वर कोपऱ्यात असलेल्या मेनूवर (
किंवा ) > ग्रुपची माहिती यावर क्लिक करा.
- किंवा सर्वात वर कोपऱ्यात असलेल्या मेनूवर (
- ग्रुपविषयी माहितीच्या उजवीकडील संपादित करा
वर क्लिक करा. - नवीन वर्णन लिहा, त्यानंतर सेव्ह करण्यासाठी राखाडी रंगाच्या बरोबरच्या खुणेवर
क्लिक करा.- तुम्ही इमोजी
चिन्हावर क्लिक करून तुमच्या माहितीमध्ये इमोजी समाविष्ट करू शकता.
- तुम्ही इमोजी