ग्रुप कसा तयार करावा आणि ग्रुपमध्ये कसे आमंत्रित करावे
तुम्ही कमाल २५६ सदस्यांचा WhatsApp ग्रुप तयार करू शकता.
ग्रुप तयार करणे
- तुमच्या WhatsApp मधील चॅट लिस्टच्या वर असलेल्या मेनू (
किंवा ) वर क्लिक करा.- तुम्ही असेही करू शकता, नवीन चॅट चिन्हावर क्लिक करा.
- नवीन ग्रुप वर क्लिक करा.
- तुम्हाला ज्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करायचे आहे, ते संपर्क शोधा किंवा निवडा. त्यानंतर हिरव्या बाणाच्या खुणेवर क्लिक करा.
- ग्रुपला नाव द्या. हे नाव ग्रुपमधील सर्वांना दिसेल.
- ग्रुपच्या नावामध्ये जास्तीतजास्त २५ कॅरेक्टर्स असू शकतात.
- तुम्ही इमोजी चिन्हावर क्लिक करून ग्रुपच्या नावामध्ये इमोजी जोडू शकता.
- तुम्ही ग्रुप फोटो जोडा
वर क्लिक करून ग्रुप आयकॉन जोडू शकता. इमेज जोडण्यासाठी फोटो घ्या, फोटो अपलोड करा किंवा वेबवर शोधा या पर्यायांपैकी एक पर्याय निवडा. इमेज निवडून सेट केल्यानंतर, तुमच्या चॅट्सच्या सूचीमधील ग्रुपच्या नावासमोर ग्रुप आयकॉन दिसू दिसेल.
- सर्व झाल्यावर बरोबरच्या हिरव्या खुणेवर क्लिक करा.
लिंक वापरून ग्रुपमध्ये आमंत्रित करणे
तुम्ही ग्रुप ॲडमिन असल्यास, तुम्ही लोकांसोबत लिंक शेअर करून त्यांना ग्रुपमध्ये आमंत्रित करू शकता. ॲडमिन जुनी निमंत्रण लिंक अवैध करून नवी लिंक तयार करण्याकरिता कधीही लिंक रिसेट करू शकतात.
- WhatsApp ग्रुप चॅट सुरू करा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
- किंवा मेनू (
किंवा सर्वात वर कोपऱ्यात असलेल्या वर) > ग्रुपची माहिती यावर क्लिक करा.
- किंवा मेनू (
- लिंक वापरून ग्रुपमध्ये आमंत्रित करा वर क्लिक करा.
- WhatsApp द्वारे लिंक पाठवा किंवा लिंक कॉपी करा यामधून निवड करा.
- WhatsApp द्वारे लिंक पाठवत असल्यास, संपर्क निवडा किंवा शोधा, त्यानंतर पाठवा वर क्लिक करा.
- लिंक रिसेट करण्यासाठी, लिंक रिसेट करा > लिंक रिसेट करा यावर टॅप करा.
टीप:
- तुम्ही ज्या WhatsApp वापरकर्त्यांसोबत आमंत्रण लिंक शेअर करत आहात, ते वापरकर्ते त्या लिंकच्या मदतीने ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात. त्यामुळे हे फीचर केवळ तुमच्या विश्वासातल्या व्यक्तींसोबतच वापरा. ज्या व्यक्तीकडे आमंत्रण लिंक आहे त्या व्यक्तीला ती लिंक इतरांना फॉरवर्ड करता येऊ शकते. अशा वेळी इतर कोणीही ग्रुपमध्ये सामील होऊ शकते आणि त्यासाठी ग्रुप ॲडमिनची परवानगी विचारली जाणार नाही.
- आम्ही येत्या काही महिन्यांत हळूहळू ग्रुपचा आकार वाढवणार आहोत; त्यामुळे हे फीचर ॲक्सेस करण्यास विलंब होऊ शकतो.