तुमचे बिझनेस प्रोफाइल कसे संपादित करावे
तुमचे बिझनेस प्रोफाइल वापरून तुम्ही तुमच्या कंपनीची माहिती, जसे की - तुमच्या बिझनेसचे नाव, पत्ता, विभाग, वर्णन, ईमेल आणि वेबसाइट, समाविष्ट करू शकता. लोक तुमचे प्रोफाइल बघतील, तेव्हा ही माहिती त्यांना सहज दिसेल.
तुमचे बिझनेस प्रोफाइल बघण्याकरिता WhatsApp Business ॲप उघडा. त्यानंतर, आणखी पर्याय
तुमच्या प्रोफाइल फोटोमध्ये बदल करणे
- तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.
- खालीलपैकी एक पर्याय निवडा:
- तुमचा सध्याचा प्रोफाइल फोटो पाहण्यासाठी फोटो पहा निवडा.
- तुमच्या कॉंप्युटरचा कॅमेरा वापरून नवीन फोटो काढण्यासाठी फोटो काढा निवडा.
- तुमच्या फाइल्समध्ये आधीपासूनच असलेला फोटो निवडून अपलोड करण्यासाठी फोटो अपलोड करा निवडा.
- तुमचा सध्याचा प्रोफाइल फोटो काढून टाकण्यासाठी फोटो काढून टाका निवडा.
तुमच्या बिझनेसचे वर्णन संपादित करणे
- वर्णन फील्डमध्ये संपादित करा
वर क्लिक करा. - तुमच्या बिझनेसकरिता तीनपर्यंत समर्पक कॅटेगरीज निवडा.
- सेव्ह करा किंवा
वर क्लिक करा.
तुमच्या बिझनेसची कॅटेगरी संपादित करणे
- कॅटेगरी फील्डमध्ये संपादित करा
वर क्लिक करा. - तुमच्या बिझनेसकरिता तीनपर्यंत समर्पक कॅटेगरीज निवडा.
- सेव्ह करा वर क्लिक करा.
तुमच्या बिझनेसचा पत्ता संपादित करणे
- पत्ता फील्डमध्ये संपादित करा
वर क्लिक करा. - तुमच्या बिझनेसचा पत्ता एंटर करा.
- सेव्ह करा किंवा
वर क्लिक करा.
तुमचे बिझनेस वेळापत्रक संपादित करणे
- वेळापत्रक फील्डमध्ये संपादित करा
वर क्लिक करा. - खालीलपैकी एक शेड्यूल टेम्पलेट निवडा:
- निवडक वेळेत उघडे: तुमचा बिझनेस काही विशिष्ट दिवशीच सुरू असेल, तर ते दिवस निवडण्यासाठी टॉगल वापरा. तुम्ही प्रत्येक दिवसासाठी कामकाजाचे नेमके तासदेखील दर्शवू शकता.
- नेहमीच उघडे: तुमचा बिझनेस आठवड्यातील कोणत्या दिवशी सुरू असेल हे निवडण्यासाठी टॉगल वापरा.
- केवळ अपॉइंटमेंटद्वारे: तुमचा बिझनेस आठवड्यातील कोणत्या दिवशी अपॉइंटमेंट घेऊन सुरू असेल हे निवडण्यासाठी टॉगल वापरा.
- सेव्ह करा वर क्लिक करा.
तुमचा ईमेल आणि वेबसाइट संपादित करणे
- तुम्हाला जी फील्ड्स अपडेट करायची आहेत, तिथे संपादित करा
वर क्लिक करा. - तुमची माहिती अपडेट करा.
- सेव्ह करा किंवा
वर क्लिक करा.
तुमचा कॅटलॉग संपादित करणे
- तुमचा कॅटलॉग अपडेट करण्यासाठी किंवा नवा कॅटलॉग तयार करण्यासाठी कॅटलॉग व्यवस्थापित करा वर टॅप करा.
- गरजेप्रमाणे तुमच्या कॅटलॉगमध्ये प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस जोडा अथवा संपादित करा. कॅटलॉग तयार आणि व्यवस्थापित कसा करावा याबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
'माझ्याबद्दल' मध्ये बदल करणे
- माझ्याबद्दल फील्डमध्ये संपादित करा
वर क्लिक करा. - तुमची माहिती अपडेट करा.
- सेव्ह करा किंवा
वर क्लिक करा.
- तुमच्या बिझनेसचे नाव, नकाशातले लोकेशन आणि फोन नंबर या गोष्टी फक्त मोबाइल डिव्हाइसवर WhatsApp Business ॲप वापरून संपादित करता येतात.
- वेबसाइटच्या फील्डमध्ये वेब ॲड्रेस टाकून तुमच्या बिझनेस प्रोफाइलमध्ये Facebook पेजेस आणि Instagram खाती जोडता येऊ शकतात.
संबंधित लेख
- तुमच्या बिझनेस प्रोफाइल विषयी माहिती
- पुढील प्लॅटफॉर्म्सवर तुमचे बिझनेस प्रोफाइल कसे संपादित करावे: Android | iPhone