तुम्ही एखादा नवीन फोन नंबर वापरणे सुरु करण्या अगोदर तुमचे WhatsApp खाते नवीन नंबरवर स्थलांतरीत करणे गरजेचे आहे. हे सहजगत्या करण्यासाठी आमचे क्रमांक बदला हे फिचर वापरा. हे फिचर वापरल्याने तुम्ही तुमची खाते माहिती(तुमच्या प्रोफाइल माहितीसह) आणि तुमचे गटदेखील स्थलांतरीत करू शकता.
तुमचा नंबर कसा बदलाल याविषयी अधिक जाणून घ्या येथे : Android | iPhone | Windows Phone
तुम्ही याची खात्री करून घ्या की तुमचे संपर्क तुमचा जुना नंबर डिलीट करून तुमचा नवीन नंबर त्यांच्या ऍड्रेस बुक मध्ये समाविष्ट करतील. अनेकवेळा मोबाइल कंपन्या जुने नंबर परत दुसर्यांना वापरण्यासाठी उपलब्ध करून देतात, तुमचा जुना नंबर इतर ग्राहकांना वाटप करण्यात येईल असा मेसेज तुम्हाला येऊ शकतो.
टीप : तुम्ही तुमचे जुने खाते डिलीट करण्याची गरज नाही. तुम्ही जेव्हा क्रमांक बदला हे फिचर यशस्वीरीत्या वापरता तुमचे जुने खाते आपोआपच डिलीट केले जाईल.
जर तुम्ही एका प्रकारच्या फोनवरून दुसऱ्यावर जात आहात जसे की iPhone वरून Android वर जात आहात आणि तुमचा नंबर तोच ठेवत असाल तर तुमची खाते माहिती तशीच ठेवली जाईल. तुम्ही तुमच्या नवीन नंबरवर WhatsApp डाउनलोड करा आणि तुमच्या नंबरची पडताळणी करा.
टीप : तुम्ही भिन्न प्रकारच्या फोनवर तुमचे संदेश स्थलांतरीत करू शकत नाही.
जर तुम्ही एका प्रकारच्या फोनवरून दुसऱ्यावर जात आहात जसे की iPhone वरून Android वर जात आहात आणि तुमचा नंबर तोच ठेवत नसाल तर तुम्ही तुमच्या नवीन फोन वर WhatsApp डाउनलोड करा आणि तुमच्या नंबरची पडताळणी करा.
महत्वाचे : तुमचे जुने खाते डिलीट करायचे लक्षात ठेवा. तुम्ही जर तुमचे जुने खाते डिलिट केले नसेल आणि तुम्ही तुमचा जुना फोन ऍक्सेस करू शकत नसाल तर काळजी करू नका. जर तुमच्या फोनच्या नंबरच्या नवीन मालकाने ४५ दिवसांनंतर त्याच्या नवीन फोनवर WhatsApp सक्रिय करण्याचा प्रयत्न केला तर त्या फोनशी संबंधित असलेली खाते माहिती पूर्णपणे डिलीट केली जाते.
तुम्ही जर समान प्रकारच्या फोनवर स्थलांतरीत होत असाल जसे की एका प्रकारच्या Android वरून दुसऱ्या Android वर तुमच्याकडे ती माहिती स्थलांतरीत करण्याचा पर्याय उपलब्ध असू शकतो. यांवर तुमच्या गप्पा कशा स्थलांतरीत कराल याविषयी जाणून घ्या येथे : Android | iPhone | Windows Phone
तुम्ही तुमचा जुना फोन काढून टाकण्याअगोदर खात्री करून घ्या की तुम्ही तुमचा सर्व डेटा पुसला आहे. जर SD कार्ड असेल तर ते देखील पुसून टाका. यामुळे तुमची खाजगी माहिती जसे की WhatsApp मेसेजेस हे चुकीच्या हातात पडण्यापासून वाचवता येतील.