सध्याचे थेट ठिकाण हे फिचर तुम्हाला तुमचे सध्याचे स्थान वैयक्तिक गप्पा किंवा गटगप्पांमध्ये ठराविक काळासाठी तात्काळ शेअर करण्याची अनुमती देते. तुम्ही तुमचे सध्याचे थेट ठिकाण शेअर करायचे की नाही किंवा किती काळ शेअर करायचे हे नियंत्रित करू शकता. तसेच तुमचे सध्याचे थेट ठिकाण शेअर करणे तुम्ही कधीही थांबवू शकता. एकदा का थांबवले किंवा ते कालबाह्य झाले तर त्यानंतर तुमचे सध्याचे थेट ठिकाण शेअर केले जात नाही. अर्थात, तुम्ही ज्या वैयक्तिक गप्पा किंवा गटगप्पांमध्ये तुमचे सध्याचे थेट ठिकाण शेअर केले होते त्यातील सदस्यांना तुमचे सुरुवातीचे स्थान दिसत राहील. ते एका स्थिर थम्बनेल प्रतिमेच्या स्वरूपात गप्पांमध्ये दिसेल. वैयक्तिक गप्पा किंवा गटगप्पांमध्ये या थम्बनेल वर टॅप करून सहभागी तुमचे शेवटचेे अपडेट केलेले स्थान बघू शकतात.
हे फिचर देखील संपूर्णपणे कूटबद्ध केलेले आहे, याचा अर्थ तुमचे सध्याचे थेट ठिकाण तुम्ही ज्या व्यक्तींबरोबर शेअर केले आहे त्यांनाच फक्त ते दिसेल इतर कोणालाही नाही. WhatsApp च्या सुरक्षेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया WhatsApp सुरक्षितता पृष्ठाला भेट द्या. WhatsApp च्या गोपनीयता पद्धतींच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे गोपनीयता धोरण देखील वाचू शकता.
सध्याचे थेट ठिकाण शेअर करण्यासाठी तुम्हाला WhatsApp मध्ये लोकेशन्स परवानग्या सक्षम कराव्या लागतील. त्यासाठी तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्ज > ॲप्स आणि सूचना > प्रगत > ॲप परवानग्या > स्थान > WhatsApp चालू वर सेट करून ते करू शकता.
तुम्ही असेही करू शकता, जर तुम्ही WhatsApp नुकतेच उघडले असेल तर सेटिंग्ज > ॲप्स आणि सूचना > WhatsApp > परवानग्या > स्थान चालू वर सेट करा.
वर सध्याचे थेट ठिकाण कसे वापरायचे ते जाणून घ्या : iPhone | Windows Phone