मुलभूतरित्या, गटातील कोणताही सदस्य गट विषय, गटचिन्ह, गट वर्णन बदलू शकतात किंवा संदेश पाठवू शकतात. परंतु, गट ॲडमीन गटाचे सेटिंग असे बदलू शकतात की केवळ ॲडमीनच गट माहिती संपादित करू शकतात किंवा संदेश पाठवू शकतात.
गट सेटिंग बदलणे
गट माहिती संपादित करण्याकरिता गट सेटिंग्ज बदलण्यासाठी :
WhatsApp गट गप्पा वर जा आणि त्यानंतर गट विषयावर टॅप करा.
तुम्ही असेही करू शकता, गप्पा टॅब मध्ये जाऊन गटावर वर टॅप करून होल्ड करा. त्यानंतर अधिक पर्याय > गट माहिती वर टॅप करा.
गट सेटिंग्ज > गट माहिती संपादित करा वर टॅप करा.
सर्व सहभागी किंवा केवळ अॅडमीन यापैकी कोणाला गट माहिती बदलण्याची परवानगी द्यायची ते निवडा.
ठीक आहे वर टॅप करा.
संदेश पाठवण्याकरिता गट सेटिंग्ज बदलण्यासाठी :
WhatsApp गट गप्पा वर जा आणि त्यानंतर गट विषयावर टॅप करा.
तुम्ही असेही करू शकता, गप्पा टॅब मध्ये जाऊन गटावर वर टॅप करून होल्ड करा. त्यानंतर अधिक पर्याय > गट माहिती वर टॅप करा.
गट सेटिंग्ज > संदेश पाठवा वर टॅप करा.
सर्व सहभागी किंवा केवळ अॅडमीन यापैकी कोणाला संदेश पाठवण्याची परवानगी द्यायची ते निवडा.
ठीक आहे वर टॅप करा.
टीप : गटामध्ये अॅडमीन वर टॅप करून नंतर त्यांना संदेश पाठवायचा असलेल्या अॅडमीनच्या नावावर टॅप करून सहभागी थेट अॅडमीनशी संपर्क साधू शकतात.
गट विषय बदलणे
विषय बदलण्यासाठी :
WhatsApp गट गप्पा वर जा आणि त्यानंतर गट विषयावर टॅप करा.
तुम्ही असेही करू शकता, गप्पा टॅब मध्ये जाऊन गटावर वर टॅप करून होल्ड करा. त्यानंतर अधिक पर्याय > गट माहिती वर टॅप करा.
गट विषयाच्या उजवीकडील असलेल्या संपादन वर टॅप करा.
नवीन विषय लिहा आणि जतन करा वर टॅप करा.
विषय मर्यादा २५ कॅरॅक्टर्स इतकी आहे.
तुम्ही इमोजी वर टॅप करून विषयामध्ये इमोजी समाविष्ट करू शकता.
गट चिन्ह बदलणे
गट चिन्ह बदलण्यासाठी :
WhatsApp गट गप्पा वर जा आणि त्यानंतर गट विषयावर टॅप करा.
तुम्ही असेही करू शकता, गप्पा टॅब मध्ये जाऊन गटावर वर टॅप करून होल्ड करा. त्यानंतर अधिक पर्याय > गट माहिती वर टॅप करा.
गट चिन्हावर टॅप करा > संपादन वर टॅप करा.
गॅलरी, कॅमेरा किंवा वेब वर शोधा वापरून नवीन प्रतिमा जोडा किंवा चिन्ह हटवा या पर्यायांमधून निवड करा.
गट वर्णन बदलणे
गट वर्णन बदलण्यासाठी :