जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तुमच्या WhatsApp खात्याचा इतर कोणी वापर करू शकत नाही याची खात्री करून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.
काय करावे
- तुमचे सिमकार्ड लॉक करा. सिमकार्ड लॉक करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल प्रदात्या कंपनीशी त्वरित संपर्क साधा. त्यामुळे त्या फोनवर खात्याची पडताळणी करणे शक्य होणार नाही कारण त्यासाठी तुम्ही कॉल्स किंवा संदेश मिळविण्यास असमर्थ असाल.
- यावेळी तुमच्याकडे दोन पर्याय असतील :
- तुमच्या नवीन फोनवर तोच नंबर वापरून तुमचे WhatsApp खाते सक्रिय करता येईल. तुमच्या चोरीला गेलेल्या फोनवर खाते निष्क्रिय करण्याचा हा सर्वात उत्तम मार्ग आहे. WhatsApp एकावेळी एका डिव्हाइसवर एकच फोन नंबर वापरून सक्रिय करता येते.
- आम्हाला इमेल करा आणि "गहाळ/चोरी: कृपया माझे खाते निष्क्रिय करा" असे तुमच्या इमेलच्या परिच्छेदात लिहा आणि तुमचा फोन नंबर संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्वरूपात येथे वर्णन केल्याप्रमाणे समाविष्ट करून आम्हाला पाठवा.
टीप :
- जर तुम्ही खाते निष्क्रिय करण्याची विनंती केली नसेल तर सिमकार्ड लॉक केले आणि फोन सर्व्हिस अक्षम केली असेल तरी WhatsApp वाय-फाय चा वापर करून वापरता येऊ शकते.
- आम्ही तुमच्या फोनचे स्थान निश्चित करू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या फोनवरून WhatsApp निष्क्रिय करणे शक्य नाही.
- जर तुम्ही Google Drive, iCloud किंवा OneDrive वापरून बॅकअप तयार केला असेल तर तुम्ही तुमचा गप्पा इतिहास पुनर्संचयित करू शकता. ते कसे करायचे ते जाणून घ्या येथे : Android | iPhone | Windows Phone.
खाते निष्क्रिय केल्यानंतर हे होते
- ते पूर्णपणे डिलीट झालेले नसते.
- तुमचे संपर्क तुमचे प्रोफाइल अजूनही बघू शकतात.
- जर तुमच्या मित्रांनी तुमच्या नावाचा शोध घेतला तर तुमचे नाव तरीही दिसू शकते.
- तुमचे संपर्क तुम्हाला संदेश पाठवू शकतात जे पुढील ३० दिवस पेंडिंग स्टेट मध्ये अर्थात अपूर्णावस्थेत असतात.
- तुम्ही खाते डिलीट करण्याअगोदर जर का ते परत सक्रिय केले तर तुम्हाला तुमच्या फोनवरील सर्व पेंडिंग मेसेजेस दिसतात आणि तुम्ही अजूनही सर्व गटगप्पांचे सदस्य असता.
- निष्क्रिय केलेले खाते जर ३० दिवसात परत सक्रिय केले गेले नाही तर ते पूर्णपणे डिलीट केले जाते.