लेबल्स कशी वापरावीत
लेबल्स तुम्हाला तुमची चॅट्स आणि मेसेजेस संगतवार लावण्यात व झटपट शोधण्यात मदत करू शकतात. तुम्ही विविध रंगांची किंवा नावांची लेबल्स तयार करू शकता, तसेच संपूर्ण चॅट किंवा चॅटमधील काही विशिष्ट मेसेजेससाठी लेबल जोडू शकता.
लेबल्स तयार करणे
- WhatsApp Business ॲप उघडा > सेटिंग्ज वर टॅप करा.
- बिझनेस टूल्स > लेबल > नवीन लेबल जोडा यावर टॅप करा.
- लेबलचे नाव लिहा > सेव्ह करा वर टॅप करा.
किंवा, चॅट्स वर टॅप करा आणि तुमच्या स्क्रीनवर खाली स्वाइप करा. त्यानंतर, लेबल्स > नवीन लेबल जोडा यावर टॅप करा > लेबलचे नाव लिहा > सेव्ह करा वर टॅप करा.
टीप: तुम्ही कमाल २० लेबल्स समाविष्ट करू शकता.
चॅट किंवा मेसेजला लेबल जोडणे
- चॅट: चॅटवर डावीकडे स्वाइप करा > अधिक > चॅटला लेबल जोडा यावर टॅप करा > तुम्हाला जोडायची आहेत ती लेबल्स निवडा.
- मेसेज: मेसेजवर टॅप करून धरून ठेवा > लेबल वर टॅप करा > तुम्हाला जोडायची आहेत ती लेबल्स निवडा.
टीप: चॅटला एकाहून अधिक लेबल्स जोडल्यास, लेबल्स बाजूबाजूला दिसतील. मेसेजला एकाहून अधिक लेबल्स जोडल्यास, लेबल्स स्टॅक केलेल्या रूपात दिसतील.
लेबल जोडलेला आशय शोधणे
- चॅट्स वर टॅप करा > खाली स्वाइप करा > लेबल्स वर टॅप करा.
- लेबलवर टॅप करा.
चॅट्स या स्क्रीनवरून, त्या चॅटशी संलग्न सर्व लेबल्स पाहण्यासाठी तुम्ही ग्राहकाच्या प्रोफाइल फोटोवर किंवा ग्रुप आयकॉनवरदेखील टॅप करू शकता.
बिझनेसशी संबंधित टीप: "नवीन ग्राहक" आणि "पुन्हा आलेला ग्राहक" यांसारख्या चॅट्ससाठी लेबल्स तयार केल्यामुळे तुम्हाला तुमच्या ग्राहकांच्या खर्च करण्याच्या सवयींचा माग ठेवण्यात मदत होते.
लेबल्स व्यवस्थापित करणे
चॅट्स वर टॅप करा आणि तुमच्या स्क्रीनवर खाली स्वाइप करा. त्यानंतर, लेबल्स वर टॅप करा. तुम्ही पुढील बदल करू शकता:
- लेबल संपादित करणे: लेबल > संपादित करा यावर टॅप करा.
- लेबलचा रंग बदलणे: लेबलवर टॅप करा > संपादित करा > रंग
यावर टॅप करा > रंग निवडा > सेव्ह करा वर टॅप करा. - लेबल हटवणे: लेबल > संपादित करा > लेबल हटवा > हटवा यावर टॅप करा.