कॅटलॉगच्या मदतीने तुमच्या सद्य आणि भावी ग्राहकांना तुमच्या बिझनेसची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस पाहता येतात, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारता येतात आणि तुमच्या बिझनेसशी संपर्क साधता येतो. ग्राहक त्यांना रस वाटतो ती प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस त्यांच्या मित्रमैत्रीणींसोबत शेअर करू शकतात किंवा त्यांच्याबाबत प्रश्न विचारण्यासाठी बिझनेसला मेसेज करू शकतात.
कॅटलॉगमधून एखादे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करण्यासाठी:
ज्या व्यक्तीला कॅटलॉगची किंवा प्रॉडक्ट/सर्व्हिसची लिंक पाठवली आहे, त्या व्यक्तीने ती लिंक WhatsApp Messenger किंवा WhatsApp Business मधून उघडल्यास थेट कॅटलॉग उघडेल.
पण कॅटलॉगची लिंक ईमेल किंवा ब्राउझरवरून शेअर केली असल्यास, लिंक मिळवणाऱ्या व्यक्तीला ती लिंक उघडण्यासाठी योग्य ते ॲप निवडावे लागेल.