प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस ग्राहकांसोबत कशा शेअर कराव्यात
कॅटलॉगच्या मदतीने तुम्हाला तुमच्या सध्याच्या आणि नव्या ग्राहकांसोबत तुमची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस शेअर करता येतात.
एखाद्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये तुमचा कॅटलॉग शेअर करण्यासाठी:
- WhatsApp Business ॲपमध्ये तुम्हाला हवे असलेले चॅट उघडा.
- मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या चौकटीच्या बाजूच्या अटॅच करा
वर टॅप करा. त्यानंतर, कॅटलॉग वर टॅप करा. - पाठवा
वर टॅप करा.
एखाद्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करण्यासाठी:
- WhatsApp Business ॲपमध्ये तुम्हाला हवे असलेले चॅट उघडा.
- मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या चौकटीच्या बाजूच्या अटॅच करा
वर टॅप करा. त्यानंतर, कॅटलॉग वर टॅप करा. - तुम्हाला शेअर करायचे आहे ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस निवडा.
- पाठवा
वर टॅप करा.
संपूर्ण कॅटलॉग शेअर करण्यासाठी:
- WhatsApp Business ॲप उघडा.
- अधिक पर्याय
> बिझनेस टूल्स > कॅटलॉग यावर टॅप करा. - अधिक पर्याय > शेअर करा यावर टॅप करा.
- त्यानंतर तुम्ही तुमच्या संपर्कांना किंवा संभाव्य ग्राहकांना WhatsApp Business ॲपद्वारे लिंक पाठवू शकता किंवा ईमेल अथवा इतर तृतीय पक्ष मेसेजिंग ॲप्स वापरून लिंक शेअर करू शकता.
विशिष्ट प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करण्यासाठी:
- WhatsApp Business ॲप उघडा आणि सेटिंग्ज > बिझनेस टूल्स > कॅटलॉग यावर जा.
- तुम्हाला शेअर करायचे आहे ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस निवडा.
- अधिक पर्याय वर टॅप करा.
- त्यानंतर तुम्ही पुढीलपैकी एक पर्याय निवडून तुमच्या संपर्कांना किंवा संभाव्य ग्राहकांना काही विशिष्ट प्रॉडक्ट्स अथवा सर्व्हिसेस फॉरवर्ड करू शकता किंवा त्यांच्यासोबत शेअर करू शकता:
- प्रॉडक्ट फॉरवर्ड करा
: WhatsApp Business ॲपद्वारे थेट ग्राहकांसोबत प्रॉडक्ट अथवा सर्व्हिस शेअर करा. - शेअर करा
: WhatsApp Business ॲप, ईमेल किंवा इतर तृतीय पक्ष मेसेजिंग ॲप्स वापरून प्रॉडक्ट अथवा सर्व्हिसची लिंक शेअर करा.
- प्रॉडक्ट फॉरवर्ड करा
टीप: कॅटलॉग आणि प्रॉडक्ट लिंक्स आपोआप जनरेट होत असल्यामुळे त्या शेअर करण्यापूर्वी कस्टमाइझ करता येत नाहीत.