तुमचे बिझनेस प्रोफाइल कसे संपादित कराल
तुमचे बिझनेस प्रोफाइल वापरून तुम्ही तुमच्या कंपनीची माहिती जसे की तुमच्या बिझनेसचे नाव, पत्ता, विभाग, वर्णन, ईमेल आणि वेबसाइट समाविष्ट करू शकता. जेव्हा लोक तुमचे प्रोफाइल बघतील तेव्हा ही माहिती त्यांना सहज दिसेल.
तुमचे बिझनेस प्रोफाइल संपादित करण्यासाठी:
- WhatsApp Business ॲप उघडा > सेटिंग्ज > बिझनेस टूल्स > बिझनेस प्रोफाइल वर टॅप करा.
- अपडेट करण्यासाठी कोणत्याही फिल्डवर टॅप करा आणि > सेव्ह करा वर टॅप करा.