एखादा ग्राहक तुम्हाला पहिल्यांदाच मेसेज करत असेल किंवा एखाद्या ग्राहकाशी १४ दिवसांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच बोलणे होत असेल, तर त्यांना एक 'स्वागत संदेश' आपोआप पाठवला जातो.
स्वागत संदेश सेट करण्यासाठी:
अधिक पर्याय > बिझनेस टूल्स > स्वागत संदेश यावर टॅप करा.
स्वागत संदेश पाठवा सुरू करा.
संदेश संपादित करायचा असल्यास त्यावर टॅप करा.
‘प्राप्तकर्ते’ अंतर्गत तुम्ही खालीलपैकी एका पर्यायावर टॅप करू शकता:
सर्व हा पर्याय निवडून तुमच्या कामकाजाच्या वेळेत मेसेज पाठवणाऱ्या कोणालाही स्वागत संदेश पाठवण्याची व्यवस्था करू शकता.
ॲड्रेस बुकमध्ये नसलेले सर्व हा पर्याय निवडून तुम्ही तुमच्या ॲड्रेस बुकमध्ये नसणाऱ्या सर्वांना स्वागत संदेश पाठवू शकता.
हे सोडून इतर सर्वजण... हा पर्याय निवडून तुम्ही काही निवडक संपर्कांना वगळून इतर सर्व संपर्कांना स्वागत संदेश पाठवू शकता.
केवळ यांना पाठवा... हा पर्याय निवडून तुम्ही निवडक संपर्कांना स्वागत संदेश पाठवू शकता.
सेव्ह करा वर टॅप करा.
टीप: तुमच्या फोनमध्ये सक्रिय इंटरनेट कनेक्शन असते, तेव्हाच हे स्वागत संदेश पाठवले जातात.