प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस ग्राहकांसोबत कशा शेअर कराव्यात
कॅटलॉगच्या मदतीने तुम्हाला तुमच्या सध्याच्या आणि नव्या ग्राहकांसोबत तुमची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस शेअर करता येतात.
एखाद्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये तुमचा कॅटलॉग शेअर करण्यासाठी:
- WhatsApp Business ॲपमध्ये तुम्हाला हवे असलेले चॅट उघडा.
- मेसेज लिहिण्याच्या जागेशेजारी असलेल्या अटॅचमेंट चिन्हावर टॅप करा.
- त्यानंतर, कॅटलॉग वर टॅप करा.
- सर्वात वर असलेल्या सर्व प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस पाठवा वर टॅप करा.
एखाद्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करण्यासाठी:
- WhatsApp Business ॲपमध्ये तुम्हाला हवे असलेले चॅट उघडा.
- मेसेज लिहिण्याच्या जागेशेजारी असलेल्या अटॅचमेंट चिन्हावर टॅप करा.
- त्यानंतर, कॅटलॉग वर टॅप करा.
- तुम्हाला शेअर करायची आहेत ती प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस निवडा.
- पाठवा वर टॅप करा.
कॅटलॉग मॅनेजरच्या मदतीने संपूर्ण कॅटलॉग शेअर करण्यासाठी:
- WhatsApp Business ॲप उघडा आणि सेटिंग्ज > बिझनेस टूल्स > कॅटलॉग यावर जा.
- तुम्ही कॅटलॉग मॅनेजरवर आलात की, सर्वात वरच्या लिंकच्या चिन्हावर टॅप करा.
- त्यानंतर तुम्ही तुमच्या संपर्कांना किंवा संभाव्य ग्राहकांना तुमचा संपूर्ण कॅटलॉग फॉरवर्ड करू शकता किंवा तो त्यांच्यासोबत शेअर करू शकता. त्यासाठी तुम्ही खालीलपैकी एक पर्याय निवडू शकता:
- WhatsApp Business द्वारे लिंक पाठवा: हा पर्याय वापरून तुम्ही कॅटलॉगची लिंक WhatsApp वरून इतरांसोबत शेअर करू शकता
- लिंक कॉपी करा: हा पर्याय वापरून तुम्ही कॅटलॉगची लिंक कॉपी करू शकता
- लिंक शेअर करा: हा पर्याय वापरून तुम्ही ईमेल किंवा इतर मेसेजिंग ॲप्सवरून कॅटलॉग शेअर करू शकता.
कॅटलॉग मॅनेजरमधून विशिष्ट प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करण्यासाठी:
- WhatsApp Business ॲप उघडा आणि सेटिंग्ज > बिझनेस टूल्स > कॅटलॉग यावर जा.
- तुम्हाला शेअर करायचे आहे ते विशिष्ट प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस कॅटलॉग मॅनेजरमधून निवडा. त्यानंतर, सर्वात वर उजव्या बाजूला असलेल्या लिंक चिन्हावर टॅप करा.
- त्यानंतर तुम्ही तुमच्या संपर्कांसोबत किंवा संभाव्य ग्राहकांसोबत तुमच्या कॅटलॉगमधील एखादे विशिष्ट प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करू शकता. त्यासाठी तुम्ही खालीलपैकी एक पर्याय निवडू शकता:
- WhatsApp Business द्वारे लिंक पाठवा: हा पर्याय वापरून तुम्ही निवडलेल्या प्रॉडक्ट/सर्व्हिसची लिंक WhatsApp वरून इतरांसोबत शेअर करू शकता
- लिंक कॉपी करा: हा पर्याय वापरून तुम्ही कॅटलॉगची लिंक कॉपी करू शकता
- लिंक शेअर करा: हा पर्याय वापरून तुम्ही ईमेलमधून किंवा सोशल साइट्सवर कॅटलॉग शेअर करू शकता.
प्रॉडक्ट/सर्व्हिसच्या आणि कॅटलॉगच्या लिंक्स ऑटो-जनरेट होत असल्याने त्या कस्टमाइझ करता येत नाहीत.