तुमचे बिझनेस प्रोफाइल कसे संपादित करावे
तुमचे बिझनेस प्रोफाइल वापरून तुम्ही तुमच्या कंपनीची माहिती, जसे की - तुमच्या बिझनेसचे नाव, पत्ता, विभाग, वर्णन, ईमेल आणि वेबसाइट, समाविष्ट करू शकता. लोक तुमचे प्रोफाइल बघतील, तेव्हा ही माहिती त्यांना सहज दिसेल.
तुमचे बिझनेस प्रोफाइल बघण्यासाठी WhatsApp Business ॲप उघडा. त्यानंतर, आणखी पर्याय
तुमच्या प्रोफाइल फोटोमध्ये बदल करणे
- तुमच्या प्रोफाइल फोटोवरील संपादन करा
वर टॅप करा. - सध्या उपलब्ध असलेल्या फोटोपैकी एखादा फोटो निवडण्यासाठी गॅलरी वर टॅप करा किंवा नवा फोटो घेण्यासाठी कॅमेरा वर टॅप करा. तुमचा सध्याचा प्रोफाइल फोटो काढण्यासाठी तुम्ही फोटो काढा वरदेखील टॅप करू शकता.
- फोटो निवडला किंवा नवीन फोटो काढला, की आवश्यकतेनुसार फोटो क्रॉप करा किंवा रोटेट करा.
- पूर्ण झाले वर टॅप करा.
तुमच्या बिझनेसचे नाव आणि वर्णन संपादित करणे
- तुम्हाला जी फील्ड्स अपडेट करायची आहेत, तिथे संपादित करा
वर टॅप करा. - तुम्हाला हवे असलेले बदल करा.
- ठीक आहे किंवा सेव्ह करा वर टॅप करा.
तुमच्या बिझनेसची कॅटेगरी संपादित करणे
- कॅटेगरी फील्डमध्ये संपादित करा
वर टॅप करा. - तुमच्या बिझनेसकरिता कमाल तीन समर्पक कॅटेगरीज निवडा.
तुमच्या बिझनेसचा पत्ता संपादित करणे
- पत्ता फील्डमध्ये संपादित करा
वर टॅप करा. - पत्ता फील्डवर टॅप करा > तुमच्या बिझनेसचा पत्ता एंटर करा.
- नकाशावर लोकेशन सेट करा किंवा नकाशावर लोकेशन अपडेट करा यावर टॅप करून तुम्ही तुमचे नकाशातले लोकेशन अपडेट करू शकता.
- त्यानंतर, नकाशावर तुमच्या बिझनेसचा पत्ता अपडेट करा किंवा खालीलपैकी एक पर्याय निवडा:
- तुम्ही पत्त्याच्या फील्डमध्ये जे एंटर केले आहे ते नकाशावर दिसावे यासाठी अपडेट करा निवडा.
- बिझनेस ॲड्रेस फील्डमध्ये परत जाऊन तुमचा पत्ता बदलण्याकरिता पत्ता संपादित करा निवडा.
- नकाशावर विशिष्ट स्थान शोधण्यासाठी मला लोकेशन सेट करू द्या निवडा.
- पूर्ण झाले वर टॅप करा. टीप: यामुळे नकाशावर तुमच्या बिझनेसचे फक्त लोकेशन बदलेल. तुम्ही पत्ता फील्डमध्ये एंटर केलेला पत्ता तोच राहील.
- सेव्ह करा वर टॅप करा.
तुमचे बिझनेस वेळापत्रक संपादित करणे
- बिझनेस वेळापत्रक फील्डमध्ये संपादित करा
वर टॅप करा. - शेड्यूल करा वर टॅप करा.
- खालीलपैकी एक शेड्यूल टेम्पलेट निवडा:
- निवडक वेळेत उघडे: तुमचा बिझनेस काही विशिष्ट दिवशीच सुरू असेल, तर ते दिवस निवडण्यासाठी टॉगल वापरा. तुम्ही प्रत्येक दिवसासाठी कामकाजाचे नेमके तासदेखील दर्शवू शकता.
- नेहमीच उघडे: तुमचा बिझनेस आठवड्यातील कोणत्या दिवशी सुरू असेल हे निवडण्यासाठी टॉगल वापरा.
- केवळ अपॉइंटमेंटद्वारे: तुमचा बिझनेस आठवड्यातील कोणत्या दिवशी अपॉइंटमेंट घेऊन सुरू असेल हे निवडण्यासाठी टॉगल वापरा.
- सेव्ह करा वर टॅप करा.
तुमचे बिझनेस वेळापत्रक रिसेट करण्यासाठी आणखी पर्याय > पुसा वरदेखील टॅप करू शकता.
तुमचा ईमेल आणि वेबसाइट संपादित करणे
- तुम्हाला जी फील्ड्स अपडेट करायची आहेत, तिथे संपादित करा
वर टॅप करा. - तुमची माहिती अपडेट करा.
- सेव्ह करा वर टॅप करा.
तुमचा कॅटलॉग संपादित करणे
- तुमचा कॅटलॉग अपडेट करण्यासाठी किंवा नवा कॅटलॉग तयार करण्यासाठी व्यवस्थापित करा वर टॅप करा.
- आवश्यकतेनुसार तुमच्या कॅटलॉगमध्ये प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस जोडा अथवा संपादित करा. कॅटलॉग तयार आणि व्यवस्थापित कसा करावा याबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
'माझ्याबद्दल' मध्ये बदल करणे
- माझ्याबद्दल फील्डमध्ये संपादित करा
वर टॅप करा. - तुम्ही कस्टम माझ्याबद्दल मेसेज तयार करू शकता किंवा माझ्याबद्दल निवडा विभागातील एखादे प्रीसेट निवडू शकता.
तुमचा फोन नंबर संपादित करणे
तुमचा फोन नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी माझ्याबद्दल फील्डमध्ये संपादित करा
संबंधित लेख:
- तुमच्या बिझनेस प्रोफाइल विषयी माहिती
- पुढील प्लॅटफॉर्म्सवर तुमचे बिझनेस प्रोफाइल कसे संपादित करावे: iPhone | Web आणि Desktop