WhatsApp चालण्यासाठी iPhone वर iOS 9 किंवा त्यानंतरची आवृत्ती असणे गरजेचे आहे. iOS 8 वर तुम्ही नवीन खाते निर्माण करू शकत नाही किंवा आधीपासून असलेले खाते परत पडताळू शकत नाही. जर iOS 8 डिव्हाइस वर WhatsApp सध्या सक्रिय असेल तर तुम्ही १ फेब्रुवारी २०२० पर्यंत ते वापरू शकता.
उत्तम अनुभवासाठी, आम्ही अशी शिफारस करतो की तुम्ही तुमच्या फोनसाठी उपलब्ध असलेली सगळयात नवीन iOS आवृत्ती वापरा. तुमच्या iPhone चे सॉफ्टवेअर कसे अपडेट करायचे हे जाणून घेण्यासाठी कृपया Apple सपोर्ट वेबसाईटवर वाचा.
आम्ही स्पष्टपणे जेलब्रोकन किंवा अनलॉक्ड डिव्हाइसेस वर मर्यादा आणत नाही. परंतु असे बदल केल्याने तुमच्या डिव्हाइसच्या कार्यकारणीवरती परिणाम होऊ शकतो, अशा iPhone ऑपरेटिंग सिस्टमच्या बदल केलेल्या आवृत्तीला आम्ही सहाय्य प्रदान करू शकत नाही.
पुढील प्लॅटफॉर्म्सवर सपोर्ट असलेल्या डिव्हाइसेस बद्दल अधिक जाणून घ्या : Android | Windows Phone