तुम्ही तुमच्यासाठी किंवा सर्वांसाठी देखील संदेश डिलीट अर्थात हटवू शकता.
सर्वांसाठी संदेश हटविण्यासाठी
सर्वांसाठी संदेश हटविणे ही सुविधा वापरून तुम्ही विशिष्ट संदेश एखाद्या वैयक्तिक गप्पांमधून किंवा गट गप्पांमधून हटवू शकता अर्थात डिलीट करू शकता. तुम्ही जेव्हा एखादा संदेश चुकीच्या गटामध्ये पाठविता किंवा त्यामध्ये काही चूक झालेली असते अशावेळी या सुविधेचा उपयोग होतो.
तुम्ही जो संदेश सर्वांसाठी हटविला आहे त्या ठिकाणी "हा संदेश हटविण्यात आला होता" असे तुमच्या प्राप्तकर्त्यांच्या यादीत दिसेल (*). तसेच, एखाद्या गप्पांमध्ये "हा संदेश हटविण्यात आला होता" हा संदेश बघितला तर याचा अर्थ तो पाठविणाऱ्याने डिलीट केला आहे.
सर्वांसाठी संदेश हटविण्यासाठी हे करा :
- WhatsApp चालू करा आणि तुम्हाला जो संदेश हटवायचा आहे त्या गप्पांमध्ये जा.
- संदेशावर टॅप करून होल्ड करा > मेनू मधून हटवा निवडा. तुम्हे एकावेळी अनेक संदेश सुद्धा निवडू शकता.
- स्क्रीनच्या वरील भागातील हटवा
वर टॅप करा > सर्वांसाठी हटवा.
टीप :
- यशस्वीरीत्या सर्वांसाठी संदेश हटविण्यासाठी तुम्ही आणि तुमचे प्राप्तकर्ते हे WhatsApp ची Android, iPhone किंवा Windows Phone साठी असलेली नवीन आवृत्ती वापरत असणे गरजेचे आहे.
- (*) तुम्ही आणि तुमचे प्राप्तकर्ते हे WhatsApp ची Android, iPhone किंवा Windows Phone साठी असलेली नवीन आवृत्ती वापरत नसाल तर या वैशिष्ट्याला समर्थित केले जाणार नाही.
- जर हटविणे यशस्वी झाले नाही तर किंवा हटविणे प्रक्रिया पूर्ण होण्या अगोदर प्राप्तकर्त्यांना तो संदेश दिसू शकेल.
- सर्वांसाठी हटविणे यशस्वीपणे झाले की नाही याची तुम्हाला सूचना मिळणार नाही.
- तुम्ही संदेश पाठविल्यानंतर, सर्वांसाठी हटवा वापरून सर्वांसाठी संदेश हटविता येण्यासाठी तुमच्याकडे केवळ एक तासाचा अवधी असेल.
स्वतःसाठी संदेश हटविणे
तुम्ही जेव्हा स्वतः साठी संदेश हटविता तेव्हा त्याची प्रत फक्त तुमच्या वैयक्तिक चॅट मधून हटविली जाते. प्राप्तकर्ते त्याच्या गप्पांमध्ये अजूनही ते संदेश बघू शकतात. स्वतःसाठी संदेश हटविण्यासाठी हे करा :
- WhatsApp चालू करा
- संदेशावर टॅप करून होल्ड करा > मेनू मधून हटवा निवडा. तुम्ही एकावेळी अनेक संदेश सुद्धा निवडू शकता.
- स्क्रीनच्या वरील भागातील हटवा
वर टॅप करा > माझ्यासाठी हटवा.
यावर संदेश कसे हटविता येतील ते पहा येथे : iPhone | Windows Phone