आम्ही फोन नंबर विचारतो कारण त्याचा वापर करूनच WhatsApp ला WhatsApp वापरकर्ते ओळखता येतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारास आणि कुटुंबियांना संदेश पाठविणे अजून सोपे होते.
तुमच्या WhatsApp खात्यातील सदस्यांना तुमच्या अॅड्रेस बुक चा अॅक्सेस नसतो, जोपर्यंत तुम्ही "संपर्क" हे गप्पांमधील फिचर वापरून संपर्क शेअर करत नाही. आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि आम्ही तुमची वैयक्तिक माहिती ना कधी कोणाबरोबरही शेअर केली आहे, करत नाही आणि करणार नाही. जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असेल तर कृपया आमचे गोपनीयता धोरण वाचा त्यातून तुम्हाला आमच्या गोपनीयता तत्त्वांबद्दल अधिक जाणकारी मिळेल.
WhatsApp सातत्याने तुमच्या अॅड्रेस बुक मधील फोन नंबर वर लक्ष ठेऊन असते आणि कोणते फोन नंबर WhatsApp वर सत्यापित झाले आहेत ते तपासते. तुमच्या ऍड्रेस बुक मधील WhatsApp वापरकर्ते हे संपर्क म्हणून दिसतील आणि तेथून त्यांना संदेश पाठविता येईल. संपर्क हे सर्व चालू असताना, फोन नंबर WhatsApp कडे तपासणी करण्यासाठी सुरक्षितपणे एन्क्रिप्टेड कनेक्शन मार्फत पाठविले जातात. त्यानंतर तुमच्या अॅड्रेस बुक मधील नावे तुम्हाला अॅप मध्ये दिसू लागतील आणि त्यामुळे तुम्हाला कळते की तुम्ही कोणाशी गप्पा मारत आहात.