गटामधील संदेशामध्ये एखाद्याला विशिष्टपणे नमूद करण्यासाठी "@" हे चिन्ह टाईप करा आणि यादी मधून व्यक्तीचे नाव निवडा. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीस नमूद करता तेव्हा नमूद केलेल्या व्यक्तीस त्यांचा संदर्भ दिला गेल्याची अधिसूचना पाठविली जाते.
टीप : एखाद्या संपर्काने जर त्या गटाच्या अधिसूचना म्यूट करण्यासाठी काही सेटिंग केले असेल तर 'नमूद' केल्याने ते सेटिंग रद्द केले जाईल व त्यांना नमूद केलेल्या संदेशांच्या अधिसूचना प्राप्त होतील. अर्थात त्यांनी जर तुम्हाला त्यांच्या खाजगी गप्पांमध्ये म्यूट केले असेल तर त्यांना अधिसूचना मिळणार नाही.
जेव्हा तुम्ही गटापासून लांब असता तेव्हा तुम्हाला ज्या संदेशांमध्ये नमूद करण्यात आले होते ते तुम्हाला चटकन समजू शकेल तसेच गटाच्या तळाशी दिसत असलेल्या "@" चिन्हावर टॅप करून तुम्ही चटकन प्रत्युत्तर देखील देऊ शकता.