सुरुवात करण्यापूर्वी कृपया खालील गोष्टींची खात्री करून घ्या
- जो नंबर तुमचा नाही तो मोबाइल नंबर तुम्ही पडताळू शकत नाही.
- तुम्ही खात्री करून घ्या तुम्ही तुम्ही जो मोबाइल नंबर पडताळून पाहू इच्छित आहात त्यावर तुम्ही कॉल्स आणि एसएमएस प्राप्त करू शकत आहात.
- तुम्ही खात्री करून घ्या तुम्ही सर्व कॉल प्रतिबंधक फीचर्स, ॲप्स किंवा टास्क किलर्स (उदा:Advanced Task Killer) हे अक्षम केलेली आहेत.
पडताळणी कशी कराल
कृपया खालील सूचनांचा क्रमाक्रमाने वापर करा :
- खात्री करून घ्या की तुमच्याकडे 2G, 3G, 4G किंवा वाय-फाय मार्फत असलेले सक्रिय इंटरनेट कनेक्शन आहे. जर तुम्ही रोमिंग मध्ये असाल किंवा जर कनेक्शन चांगले नसेल तर ही पडताळणी सुरळीतपणे चालणार नाही. तुमच्या फोनवरील ब्राऊझर वरून www.whatsapp.com चालू करा आणि तुम्ही इंटरनेट कनेक्शनशी जोडले गेले आहात का ते तपासून बघा.
- तुमचा मोबाइल नंबर योग्य स्वरूपात प्रविष्ट करा. ते महत्वाचे आहे! जो नंबर तुमचा स्वतःचा नाही तो तुम्ही पडताळू शकत नाही.
- ड्रॉप डाऊन यादीमधून तुमचा देश निवडा यामुळे डावीकडे आपोआप तुमचा कंट्री कोड प्रविष्ट केला जाईल.
- उजवीकडील चौकटीमध्ये मोबाइल नंबर प्रविष्ट करा. कृपया मोबाइल नंबरच्या अगोदर एकही शून्य लावू नका.
- कोड प्राप्त करण्यासाठी पुढे वर टॅप करा.
- तुम्हाला एसएमएस द्वारे जो ६ अंकी कोड प्राप्त झाला आहे तो प्रविष्ट करा.
- जर तुम्हाला एसएमएस प्राप्त झाला नसेल तर कदाचित तुम्ही चांगल्या कनेक्शनवर नसाल. प्रोग्रेस बार संपेपर्यंत प्रतीक्षा करा आणि पडताळणी प्रक्रिया परत करून बघा. याकरिता साधारण १० मिनिटे लागू शकतात त्यामुळे कृपया धीर धरा.
- कृपया, कोड ओळखण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे तुम्ही ठराविक काळासाठी पडताळणी प्रक्रियेमधून लॉक आऊट केले जाल.
- जर तुम्ही कोड प्राप्त करण्याअगोदरच टायमर संपून गेला तर फोन कॉल येण्यासाठी विचारणारा पर्याय उपलब्ध केला जाईल. फोन कॉल येण्यासाठी मला कॉल करा हा पर्याय निवडा आणि तुमच्या फोनवर रिंग येण्यासाठी काही सेकंद प्रतीक्षा करा.
- जेव्हा तुम्ही उत्तर देता तेव्हा ऑटोमेटेड आवाज तुम्हाला ६ अंकी कोड सांगेल. तो कोड प्रविष्ट करा. अशारितीने आता तुमचे WhatsApp पडताळून होईल.
टीप: तुमच्या कॅरीअर वर अवलंबून आहे, तुम्हाला एसएमएस किंवा फोन कॉल साठी शुल्क पडू शकते.
समस्या निराकरणासाठी उपाय
तुम्हाला पडताळणी प्रक्रियेमध्ये अडचणी येत असतील तर खालील उपाय करून बघा :
- तुमचा फोन रिबूट करा (फोन रिबूट करण्यासाठी तो बंद करा ३० सेकंद प्रतीक्षा करा आणि तो परत सुरु करा).
- WhatsApp डिलीट करू त्याची नवीन सुधारित आवृत्ती प्रस्थापित करा. ते कसे करायचे हे माहित नसेल तर हा लेख वाचा.
- दुसऱ्या एखाद्या फोनवरून तुमच्या स्वतःच्या फोनवर तुम्ही ज्या स्वरूपात तुमचा WhatsApp नंबर प्रविष्ट केलेला आहे अगदी त्याच्या कंट्री कोडसहित त्यावर एक टेस्ट एसएमएस संदेश पाठवून बघा. यामुळे तुमच्याकडे चांगले कनेक्शन आहे की नाही हे तपासता येईल.
जर तुम्हाला पडताळणी प्रक्रियेमध्ये अजूनही समस्या असतील तर तुम्हाला मदत करण्यास आम्ही सदैव उत्सुक आहोत. मेनू > आमच्याशी संपर्क साधा येथून आम्हाला इमेल पाठवा. तुम्हाला खात्रीने कॉल किंवा एसएमएस येण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत काय काय उपाय केले त्याचे सविस्तर वर्णन पाठवा. (तुम्हाला तुमच्या फोनवर एसएमएस आला का? तुम्ही कोणता नंबर वापरलात? इ.) आम्ही तुमचा कोड सुरक्षा कारणास्तव इमेल द्वारे पाठवू शकत नाही.
यांवर पडताळणी कशी कराल ते पहा येथे : iPhone | Windows Phone