गोपनीयता आणि सुरक्षा आमच्या रक्तात भिनलेली आहे, आणि त्यासाठीच आमची नवीन आवृत्ती एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड म्हणजेच संपूर्णपणे कूटबद्ध करण्यात आलेली आहे. जेव्हा एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन केलेले असते तेव्हा तुमचे संदेश, फोटो, व्हिडिओ, व्हॉइस मेसेज, डॉक्युमेंट्स, स्टेटस अपडेट्स आणि कॉल्स हे चुकीच्या हातात पडण्यापासून सुरक्षित ठेवले जातात.
WhatsApp चे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन ग्वाही देते की केवळ तुम्ही आणि ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही संवाद साधू इच्छित आहात तेच फक्त त्यांना वाचू अथवा ऐकू शकतात, अन्य कोणीही नाही, अगदी WhatsApp देखील नाही. तुमचे संदेश हे एका कुलुपाने सुरक्षित केलेले असतात आणि केवळ तुम्ही आणि प्राप्तकर्ता यांच्याकडेच ते कुलूप उघडून तुमचे संदेश वाचण्याची विशिष्ट किल्ली असते. अधिक सुरक्षेसाठी तुम्ही पाठवत असलेल्या प्रत्येक मेसेजला युनिक कुलूप आणि किल्ली असते. हे सर्व आपोआप होते : यासाठी कोणतेही नवीन सेटिंग चालू करावे लागत नाही किंवा तुमच्या गप्पा सुरक्षित ठेवण्यासाठी गुप्त गप्पा सेट कराव्या लागत नाहीत.
महत्त्वाचे : एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन नेहमी सक्रिय असते. एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन बंद करण्याचा कोणताही मार्ग नाही.
तुम्ही पाठवत असलेले संदेश आणि कॉल्स हे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत कूटबद्ध झालेले आहेत का ते पडताळून पाहण्यासाठी तुमच्या प्रत्येक गप्पांना स्वतंत्र सुरक्षा कोड असतो.
टीप : पडताळणी प्रक्रिया ही पर्यायी आहे आणि ती तुमचे संदेश एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड आहेत का तपासण्यासाठी वापरली जाते.
हा कोड संपर्क माहिती स्क्रीनमध्ये क्यु आर कोड आणि ६०-अंकी कोडच्या स्वरूपात उपलब्ध असतो. हे कोड प्रत्येक गप्पांसाठी स्वतंत्र असतात आणि प्रत्येक व्यक्ती बरोबरील गप्पांमध्ये तुम्ही पाठवत असणारे संदेश एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड आहेत का ते पडताळून पाहता येऊ शकते. तुमच्याशी शेअर केलेला सुरक्षा कोड स्पेशल किल्लीचे दर्शनीय स्वरूप आहे आणि काळजी करू नका ही खरी किल्ली नाही ती नेहमीच गुप्त ठेवलेली असते.
जर तुम्ही आणि तुमचे संपर्क भौतिकरीत्या एकमेकांच्या जवळ असाल तर तुम्ही दुसऱ्याचा क्यु आर कोड स्कॅन करू शकता किंवा डोळ्याने ६० अंकी नंबर पडताळा. जर तुम्ही क्यु आर कोड स्कॅन केला आणि कोड समान असेल तर हिरवी बरोबरची खूण दिसेल. ते जुळले गेल्याने तुम्ही हे खात्रीपूर्वक म्हणू शकता की तुमच्या कॉल्स आणि मेसेजेस मध्ये तिसऱ्या कोणाचा हस्तक्षेप झालेला नाही.
कोड जर जुळले नाहीत तर शक्यता आहे की तुम्ही दुसऱ्या संपर्काचा कोड स्कॅन करत असाल किंवा दुसरा फोन नंबर वापरत असाल. जर तुमच्या संपर्काने नुकतेच WhatsApp परत इंस्टॉल केले असेल किंवा फोन बदलला असेल तर आम्ही असे सुचवितो की त्यांना नवीन संदेश पाठवून कोड रिफ्रेश करा आणि नंतर कोड स्कॅन करा.
सुरक्षा कोड बदलाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमची मदतपुस्तिका पहा.
जर तुम्ही आणि तुमचे संपर्क भौतिकरीत्या एकमेकांच्या जवळ नसाल तर तुम्ही त्यांना ६०-अंकी नंबर पाठवू शकता. तुमच्या संपर्काला कोड प्राप्त झाला की त्यांना सूचित करायला सांगा आणि त्यांना एन्क्रिप्शन स्क्रीनच्या खाली दिसत असणारा ६० अंकी नंबर स्वतःच्या डोळ्याने पडताळायला सांगा. Android, iPhone आणि Windows फोन वर सुरक्षा कोड सत्यापन स्क्रीनवर शेअर करा बटण वापरून तुम्ही ६० अंकी कोड एसएमएस, ई-मेल, इत्यादी मार्फत पाठवू शकता.
सर्व WhatsApp संदेश आणि कॉल्स हे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनने अर्थात संपूर्णपणे कूटबद्ध करून सुरक्षित करण्यात आलेले आहेत. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की जेव्हा तुम्ही व्यवसायाला संपर्क करता तेव्हा त्या व्यवसायाशी निगडित लोक तुमचे संदेश बघू शकतात. तुमचे संदेश साठविणे, वाचणे आणि त्यांना प्रत्युत्तर देणे अशा प्रकारची संदेश व्यवस्थापित करण्याची कामे हे व्यवसाय इतर कंपनींना देऊ शकतात.
तुम्ही ज्या व्यवसायाशी संपर्कात आहात ही त्यांची जबाबदारी आहे की ते तुमच्या संदेशांच्या बाबतीत गोपनीयता धोरणाचे पालन करतील. अधिक माहितीसाठी कृपया तुम्ही त्या संबंधित व्यवसायाशी संपर्क साधावा. व्यवसाय संदेशांमधील एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमची मदतपुस्तिका पहा.
सुरक्षितता ही WhatsApp ने प्रदान केलेली आवश्यक अशी सेवा आहे. २०१६ मध्ये आम्ही एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन वापरून तुमचे WhatsApp वरील कॉल्स आणि संदेश कूटबद्ध केले त्यामुळे तुमच्या संभाषणामधील मजकूर कोणासही कळणार नाही,.अगदी आम्हालाही नाही. तेव्हा पासून, डिजिटल सुरक्षितता ही अजूनच महत्त्वाची झाली आहे. आम्ही अशी अनेक उदाहरणे बघितली ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा गैरवापर करून हॅकर्स लोकांची खाजगी माहिती काढतात आणि त्या चोरलेल्या माहितीचा उपयोग लोकांना फसविण्यासाठी करतात. आमची नवीन वैशिष्ट्ये जसे की – व्हिडिओ कॉलिंग आणि स्टेटस येथे देखील आम्ही एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन पुरविले आहे.
WhatsApp कडे तुमचे संदेश पाहण्याची किंवा ऐकण्याची कोणतीही क्षमता नाही. कारण WhatsApp वर आलेल्या संदेशांचे जे एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन होते ते तुमच्या डिव्हाइसवर होते. एखादा संदेश डिव्हाइसमधून बाहेर पडण्याआगोदर तो एका क्रिप्टोग्राफिक कुलुपाने सुरक्षित केला जातो त्याची किल्ली ही फक्त प्राप्तकर्त्याकडे असते. शिवाय ही किल्ली प्रत्येक संदेशाबरोबर बदलली जाते. हे सर्व जरी पार्श्वभूमीमध्ये होत असले तरी तुम्ही तुमची संभाषणे सुरक्षित आहेत का हे तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील सुरक्षा कोड सत्यापित करून त्याची पडताळणी करू शकता. हे सर्व कसे कार्य करते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमचा व्हाईट पेपर जरूर वाचा.
अर्थातच, लोक आम्हाला विचारणा करीत होते की कायदेशीर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनचा कसा हातभार लागतो. जगभरातील लोक सुरक्षित राहावेत यासाठी कायदा अंमलबजावणी संस्थांचा WhatsApp आदरच करते. कायदा अंमलबजावणी तर्फे ज्या नवनवीन विनंत्या येत असतात त्यांचे आम्ही काळजीपूर्वक अवलोकन करतो, त्याची शहानिशा करतो आणि नंतर योग्य त्या कायदा आणि नियमावली नुसार त्यांची वर्गवारी करून अतिसंवेदनशील विनंतीस उत्तर देतो. समाज प्रबोधन हेतू, आम्ही जी मर्यादित माहिती गोळा करतो याविषयी जे कायदे आहेत आणि ते WhatsApp कडे याची विनंती कशी करू शकतात याबद्दल माहिती आम्ही प्रकाशित केलेली आहे, जी तुम्ही येथे वाचू शकता.
WhatsApp च्या सुरक्षेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया WhatsApp सुरक्षितता पृष्ठाला भेट द्या.