WhatsApp मध्ये तुम्हाला तुमच्या फोटोंमध्ये आणि व्हिडिओ मध्ये स्वतंत्रपणे अभिव्यक्त होण्यासाठी त्यामध्ये इमोजी, लेखन किंवा मुक्तहस्त रेखाटन करण्याची सोय उपलब्ध केली आहे.
ते फिचर वापरण्यासाठी :
- मजकूर लिहायच्या चौकटीमधील कॅमेरा बटणावर टॅप करा.
- नवीन फोटो किंवा व्हिडिओ घ्या किंवा विद्यमान फोटो किंवा व्हिडिओ निवडा.
- तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ मध्ये जे काही समाविष्ट करायचे असेल ते निवडा.
इमोजी समाविष्ट करणे
तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ मध्ये जेव्हा इमोजी जोडता तेव्हा तुम्ही ती फिरवू शकता, त्याचा आकार बदलू शकता आणि ती हलवू शकता.
- वरच्या बाजूला उजवीकडे असलेले इमोजी बटण निवडा.
- इमोजी निवडण्यासाठी टॅप करा.
- मीडियाच्या कोणत्याही भागामध्ये ड्रॅग करण्यासाठी इमोजी होल्ड करून ठेवा.
- इमोजीचा आकार बदलण्यासाठी :
- इमोजीवर दोन्ही बोटे बाहेरून आत (पिंच इन) अशी सरकवल्यास ती लहान होईल.
- इमोजीवर दोन्ही बोटे आतून बाहेर (पिंच आऊट) अशी सरकावल्यास ती मोठी होईल.
- इमोजी फिरविण्यासाठी तिच्यावर पिंच करा आणि फिरवा.
मजकूर लिहिण्यासाठी
जेव्हा तुम्ही तुमच्या फोटो किंवा व्हिडिओ वर मजकूर लिहिता तेव्हा तुम्ही त्याचा आकार, फॉन्ट प्रकार, रोटेशन आणि रंग बदलू शकता.
मजकूर समाविष्ट करण्यासाठी :
- वरच्या बाजूला उजवीकडे असलेले "T" बटण निवडा.
- मजकूर चौकटीमध्ये तुम्हाला हवा असलेला मजकूर टाईप करा.
- रंग निवड साधनावर तुमचे बोट वर खाली स्लाईड करून तुम्हाला हवा असलेला रंग निवडा.
- फॉन्ट प्रकार निवडण्यासाठी, रंग निवड साधनावर तुमचे बोट उजवीकडून डावीकडे असे स्लाईड करा. फॉन्ट प्रकार ठरवून झाल्यावर तुमचे बोट उचला.
- मजकुराचा आकार बदलण्यासाठी :
- मजकूरावर दोन्ही बोटे बाहेरून आत (पिंच इन) अशी सरकवल्यास तो लहान होईल.
- मजकूरावर दोन्ही बोटे आतून बाहेर (पिंच आऊट) अशी सरकावल्यास तो मोठा होईल.
- मजकूर फिरविण्यासाठी त्याच्यावर पिंच करा आणि फिरवा.
रेखाटन
तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ वर मुक्तहस्त रेखाटू शकता. तसे करण्यासाठी :
- वरच्या बाजूला उजवीकडे कोपऱ्यात असलेले पेन्सिल चिन्ह निवडा.
- रंग निवडण्यासाठी उजवीकडे असलेल्या रंग निवड साधनावरून तुमचे बोट वर खाली स्लाईड केल्याने तुम्हाला रंग निवडता येईल. तुम्ही रेखाटत असलेल्या प्रत्येक ओळीसाठी तुम्ही रंग निवडू शकता.
एकदा का तुम्हाला हवे असलेले सर्व इमोजी, मजकूर किंवा रेखाटने समाविष्ट करून झाली की पाठवा बटणावर टॅप करा. वैकल्पिकरित्या, इमोजी आणि मजकूर डिलीट करण्यासाठी त्यांना स्क्रीनच्या वरील भागात असलेल्या कचरापेटी चिन्हावर ड्रॅग करा आणि सोडा. रेखाटने डिलीट करण्यासाठी मागे घेऊन जाण्याऱ्या बाणावर टॅप करा.