तुमचे स्टेटस अपडेट्स फक्त तेच संपर्क बघू शकतात ज्यांचा फोन नंबर तुम्ही तुमच्या मोबाइलच्या ॲड्रेस बुक मध्ये साठविला आहे आणि त्यांनी तुमचा फोन नंबर त्यांच्या ॲड्रेस बुक मध्ये साठविला असेल. तुम्ही तुमचे स्टेटस अपडेट तुमच्या सर्व संपर्कांसह किंवा फक्त निवडलेल्या संपर्कांसह शेअर करायचे का हे निवडू शकता. मुलभूतरित्या, तुमचे स्टेटस अपडेट तुमच्या सर्व संपर्कांसह शेअर करण्यासाठी सेट केले आहेत.
तुमची स्टेटस गोपनीयता बदलण्यासाठी
- स्टेटस वर टॅप करा.
- Android : अधिक पर्याय
> स्टेटस गोपनीयता वर टॅप करा.
- iPhone : गोपनीयता वर टॅप करा.
- Windows Phone : मेनू >
> गोपनीयता सेटिंग्ज वर टॅप करा.
- खालीलपैकी एक पर्याय निवडा :
- माझे संपर्क : तुमचे संपर्क तुमचे 'स्टेटस' अपडेट्स बघू शकतात.
- हे सोडून माझे संपर्क… : तुम्ही निवडलेले संपर्क सोडून इतर सर्व संपर्कांना तुमचे स्टेटस अपडेट दिसेल.
- केवळ यांच्याबरोबर शेअर करा… : फक्त तुम्ही निवडलेल्या संपर्कांना तुमचे स्टेटस अपडेट दिसेल.
टीप :
- तुमच्या गोपनीयता सेटिंग्जमधील बदलांचा तुम्ही आधीच पाठवलेल्या स्टेटस अपडेटवर परिणाम होणार नाही.
- तुम्ही ‘वाचल्याच्या पोचपावत्या’ अक्षम केल्या असल्यास, तुमचे स्टेटस अपडेट कोणी पाहिले हे तुम्ही पाहू शकणार नाही. संपर्काने ‘वाचल्याच्या पोचपावत्या’ अक्षम केल्या असल्यास, त्यांनी तुमचे स्टेटस अपडेट बघितले का हे तुम्ही पाहू शकणार नाही.
स्टेटस अपडेट्स Facebook Stories आणि इतर ॲप्स वर शेअर करणे
जर तुम्ही तुमचे स्टेटस अपडेट शेअर केले तर तुमच्या स्टेटस अपडेट मधील मजकूर इतर ॲप्स बरोबर शेअर केला जाईल आणि तो एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन ने सुरक्षित असणार नाही. तुम्ही जेव्हा तुमचे स्टेटस अपडेट शेअर करता तेव्हा Facebook किंवा इतर ॲप्स वर तुमची खाते माहिती WhatsApp शेअर करत नाही.
माहिती स्रोत
- पुढील प्लॅटफॉर्म्सवर स्टेटस कसे वापरायचे हे येथे जाणून घ्या : Android | iPhone
- इतर ॲप्स वर WhatsApp स्टेटस अपडेट कसे शेअर करायचे ते या लेखामध्ये जाणून घ्या.