आम्ही आपल्याला कशी मदत करू शकतो?

आपण शोधत असलेल्या माहितीसाठी निम्नलिखित विषयांवर सुद्धा नजर टाकू शकता.

मी Chrome वर WhatsApp वेब नोटिफिकेशन/अधिसूचना कशा मिळवू?

WhatsApp वेब वापरताना तुम्ही नवीन संदेश सूचना मिळवू शकता, अधिसूचना या तुमच्या डेस्कटॉपच्या उजव्या बाजूला दिसतात.

जर तुम्हाला WhatsApp वेब नोटिफिकेशन/अधिसूचना मिळवताना अडचणी येत असतील तर ते या कदाचित या कारणांमुळे होत असेल :

 • तुम्ही अजूनही WhatsApp वेब अधिसूचना Chrome मध्ये चालू केलेल्या नाहीत.
 • तुम्ही अधिसूचना म्यूट/मूक केल्या आहेत.
 • तुम्ही Chrome मध्ये WhatsApp वेब अधिसूचना ब्लॉक/अवरोधित केल्या असतील.
 • तुम्ही सर्व WhatsApp वेब अधिसूचनांसाठी अॅलर्ट्स आणि ध्वनी तात्पुरते बंद केले असतील.

WhatsApp वेब अधिसूचना सुरु करण्यासाठी

 1. तुमच्या गप्पा यादी वरील तुमच्या अधिसूचना सुरु करा समोरील निळ्या चौकटीमध्ये क्लिक करा.

 2. स्क्रीनवरील सूचना वाचा आणि WhatsApp वेब अधिसूचना सुरु करण्यासाठी अनुमती द्या वर क्लिक करा.

जर तुम्हाला निळी चौकट दिसत नसेल तर पेज रिफ्रेश करून पहा. जर अजूनही तुम्हाला चौकट दिसत नसेल तर तुम्ही WhatsApp वेब मधून अधिसूचना मूक केल्या असतील.

WhatsApp वेब ला परवानगी देण्यासाठी

 1. Chrome मध्ये, क्लिक करा Settings > Preferences > Show advanced settings... > Websites... येथे जा.
 2. त्यामध्ये Notifications, Allow all sites to show desktop notifications किंवा Ask me when a site wants to show desktop notifications हे निवडा.
 3. Manage Exceptions वर क्लिक करा आणि web.whatsapp.com एक्सेप्शन लिस्ट मध्ये शोधा.
 4. जर Block हे web.whatsapp.com समोर लिस्ट केले असेल तर ते हाय लाईट करण्यासाठी क्लिक करा, त्यानंतर X वर क्लिक करून ते लिस्ट मधून काढा.
 5. परत WhatsApp वेब वर जा आणि आता तुम्हाला गप्पा यादीमध्ये वरील भागात निळी चौकट दिसू शकते.

 6. स्क्रीनवरील सूचना वाचा आणि WhatsApp वेब अधिसूचना सुरु करण्यासाठी अनुमती द्या वर क्लिक करा.

WhatsApp वेब अधिसूचना बंद करण्यासाठी

तुम्ही WhatsApp वेब अधिसूचना बंद किंवा ठराविक काळासाठी अक्षम करू शकता.

 • एकत्र अक्षम करण्यासाठी, WhatsApp वेब उघडा, मेनू आयकॉन वर क्लिक करा. अधिसूचना वर क्लिक करा आणि ध्वनी आणि डेस्कटॉप अॅलर्ट्स अन चेक करा.
 • ठराविक कालावधीसाठी अधिसूचना अक्षम करण्यासाठी अधिसूचना > ... साठी अॅलर्ट्स आणि ध्वनी बंद ठेवा येथे जा आणि तुम्हाला किती काळासाठी अधिसूचना बंद करायच्या आहेत ते निवडा.

जर तुम्हाला अधिसूचना परत सक्षम करायच्या असतील तर नवीन गप्पा समोरील अधिसूचना अक्षम करा या आयकॉन वर क्लिक करा.

टीप : जर तुम्ही वैयक्तिक गप्पा किंवा गट तुमच्या फोनवर मूक केले असतील ते WhatsApp वेब वर देखील मूक असतील. इतर सर्व नोटीफिकेशन सेटिंग्ज हे तुमच्या फोन आणि संगणकावर स्वतंत्र असतात आणि ते एकमेकांवर परिणाम होऊ देत नाहीत.

यांवर नोटिफिकेशन सेटिंग्ज कसे कॉन्फिगर कराल ते जाणून घ्या येथे : Firefox | Opera | Safari | Edge

धन्यवाद,
WhatsApp मदत समिती