स्टेटस वापरून तुम्ही मजकूर, फोटो, व्हिडिओ आणि GIF शेअर करू शकता जे २४ तासांनंतर लुप्त होईल. तुमच्या संपर्कांना स्टेटस अपडेट पाठविणे आणि ते प्राप्त करणे शक्य होण्यासाठी तुम्ही आणि तुमचे संपर्क दोघांनीही एकमेकांचा फोन नंबर तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुक मध्ये साठविणे गरजेचे आहे.
तुम्ही असेही करू शकता, कॅमेरा वर टॅप करून देखील फोटो, व्हिडिओ किंवा GIF स्टेटस अपडेट तयार करू शकता.
एखाद्या विशिष्ट संपर्कांकडून येणारे स्टेटस अपडेट तुमच्या स्टेटस टॅबच्या यादीमध्ये अग्रस्थानी दिसू नयेत यासाठी ते म्यूट करू शकता.