तुम्ही सर्वांसाठी किंवा तुमच्यासाठी देखील संदेश हटवू शकता.
सर्वांसाठी संदेश हटविण्यासाठी
सर्वांसाठी संदेश हटविल्याने तुम्ही ग्रुप किंवा वैयक्तिक गप्पांमध्ये पाठवलेले विशिष्ट संदेश हटविण्याची अनुमती मिळते. तुम्ही जेव्हा एखादा संदेश चुकीच्या गप्पांमध्ये पाठवता किंवा त्यामध्ये काही चूक झालेली असते अशावेळी या सुविधेचा उपयोग होतो.
तुम्ही एखादा संदेश सर्वांसाठी हटविला की तुमच्या प्राप्तकर्त्यांच्या गप्पांमध्ये _"हा संदेश हटविण्यात आला"_ असे दिसू लागेल. त्याचप्रमाणे, तुम्हाला गप्पांमध्ये _"हा संदेश हटवला होता"_ असे दिसल्यास, याचा अर्थ पाठविणाऱ्याने त्यांचा संदेश सर्वांसाठी हटवला.
सर्वांसाठी संदेश हटविण्यासाठी हे करा :
- WhatsApp चालू करा आणि तुम्हाला जो संदेश हटवायचा आहे त्या गप्पांमध्ये जा.
- संदेशावर टॅप करून होल्ड करा > मेनू मधून हटवा
निवडा. तुम्ही एकावेळी अनेक संदेश सुद्धा निवडू शकता.
- संदेशावर टॅप करून होल्ड करा >अधिक
> हटवा निवडा.
- पर्याय
> सर्वांसाठी हटवा वर टॅप करा.
टीप :
- यशस्वीरीत्या सर्वांसाठी संदेश हटविण्यासाठी तुम्ही आणि तुमचे प्राप्तकर्ते हे WhatsApp ची Android, iPhone किंवा Windows Phone साठी असलेली नवीन आवृत्ती वापरत असणे गरजेचे आहे.
- (*) तुम्ही आणि तुमचे प्राप्तकर्ते हे WhatsApp ची Android, iPhone किंवा Windows Phone साठी असलेली नवीन आवृत्ती वापरत नसाल तर या फिचरला सपोर्ट केले जाणार नाही.
- जर हटविणे यशस्वी झाले नाही तर किंवा हटविणे प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदर प्राप्तकर्त्यांना तो संदेश दिसू शकेल.
- सर्वांसाठी हटविणे यशस्वीपणे झाले की नाही याची तुम्हाला सूचना मिळणार नाही.
- तुम्ही संदेश पाठवल्यानंतर तो सर्वांसाठी हटवला जाण्यासाठी तुमच्याकडे साधारण एक तास असेल.
स्वतःसाठी संदेश हटविण्यासाठी
तुम्ही जेव्हा स्वतः साठी संदेश हटवता तेव्हा तुम्ही तुमच्या फोनवरून पाठवलेल्या किंवा त्यावर मिळवलेल्या संदेशांची प्रत फक्त तुमच्या वैयक्तिक चॅट मधून हटविली जाते. याचा तुमच्या प्राप्तकर्त्याच्या गप्पांवर परिणाम होत नाही. तुमच्या प्राप्तकर्त्यांना त्यांच्या गप्पा स्क्रीनमध्ये अजूनही संदेश दिसतील. स्वतःसाठी संदेश हटविण्यासाठी हे करा :
- WhatsApp चालू करा आणि तुम्हाला जो संदेश हटवायचा आहे त्या गप्पांमध्ये जा.
- संदेशावर टॅप करून होल्ड करा > मेनू मधून हटवा
निवडा. तुम्ही एकावेळी अनेक संदेश सुद्धा निवडू शकता.
- संदेशावर टॅप करून होल्ड करा >अधिक
> हटवा निवडा.
- हटवा
> हटवा वर टॅप करा.
टीप : कृपया, लक्षात घ्या की एकदा का तुमचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवले की आम्ही ते आमच्या सर्व्हर वर साठवून ठेवत नाही.
पुढील प्लॅटफॉर्म्सवर संदेश कसा हटवायचा ते जाणून घ्या : Android | Windows Phone