तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडून येणारे WhatsApp संदेश,कॉल्स आणि स्टेटस अपडेट्स ब्लॉक अर्थात अवरोधित करून त्यांचे येणे बंद करू शकता.
संपर्क ब्लॉक करणे
- WhatsApp चालू करा सेटिंग्ज > खाते > गोपनीयता > ब्लॉक केलेले > नवीन जोडा... येथे जा.
- तुम्हाला जो संपर्क ब्लॉक करायचा असेल तो शोधा आणि त्यावर टॅप करा.
संपर्क ब्लॉक करण्यासाठी इतर काही मार्ग :
- संपर्काबरोबर झालेले चॅट उघडा नंतर संपर्क नाव > संपर्क ब्लॉक करा > ब्लॉक करा किंवा तक्रार करून ब्लॉक करा वर टॅप करा.
- तुमच्या चॅट वर डावीकडे स्वाईप करा आणि गप्पा, अधिक > संपर्क माहिती > संपर्क ब्लॉक करा > ब्लॉक किंवा तक्रार करून ब्लॉक करा वर टॅप करा.
अनोळखी फोन नंबरला ब्लॉक करणे
अनोळखी फोन नंबरला ब्लॉक करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत :
- या फोन नंबर वरून तुम्हाला पहिल्यांदाच संदेश आला असेल तर तुम्ही ते चॅट उघडून ब्लॉक करा > ब्लॉक करा वर टॅप करा.
- फोन नंबर बरोबर झालेले चॅट उघडा नंतर संपर्क नाव > संपर्क ब्लॉक करा > ब्लॉक करा किंवा तक्रार करून ब्लॉक करा वर टॅप करा.
टीप :
- ब्लॉक अर्थात अवरोधित केलेल्या संपर्कांकडून संदेश, कॉल्स आणि स्टेटस अपडेट तुमच्या फोनवर कधीच दिसणार नाहीत आणि आपल्याला कधीही वितरित केल्या जाणार नाहीत.
- आपण अवरोधित केलेल्या संपर्कासाठी आपले ‘अखेरचे पाहिलेले’ आणि ‘ऑनलाइन’ माहिती यापुढे दृश्यमान राहणार नाही.
- एखाद्याला ब्लॉक केल्याने तो तुमच्या संपर्क यादीतून काढला जाणार नाही, तसेच आपण त्या संपर्काच्या ॲॅड्रेस बुकमधून काढून टाकणार नाही. एखादा संपर्क हटवण्यासाठी, आपण आपल्या फोनच्या ॲॅड्रेस बुकमधून तो संपर्क हटविणे आवश्यक आहे.
- आपण एखाद्याला ब्लॉक करत असल्यास त्या व्यक्तीला याबद्दल माहिती आहे की नाही याबद्दल साशंक असल्यास, कृपया हा लेख पहा.
संपर्क अनब्लॉक करणे
- सेटिंग्ज > खाते > गोपनीयता> ब्लॉक केलेले वर टॅप करा.
- संपर्काचे नाव डावीकडे स्वाईप करा.
- तुम्ही असेही करू शकता, संपादन > लाल रंगाच्या वजा चिन्हावर टॅप करा.
- अनब्लॉक टॅप करा.
संपर्क अनब्लॉक करण्यासाठी अजून काही मार्ग :
- संपर्काबरोबर झालेले चॅट उघडा नंतर संपर्क नाव > अनब्लॉक करा वर टॅप करा.
- तुमच्या चॅट वर डावीकडे स्वाईप करा आणि गप्पा, अधिक > संपर्क माहिती > संपर्क अनब्लॉक करा वर टॅप करा.
टीप : तुम्ही जर संपर्काला अनब्लॉक केले तर मध्यंतरीच्या काळात जेव्हा ते ब्लॉक होते तेव्हाचे संदेश किंवा कॉल्स तुम्हाला मिळणार नाहीत.
संबंधित लेख :
संपर्क ब्लॉक आणि अनब्लॉक कसे करावेत : Android | KaiOS