WhatsApp चे 'क्लिक टू चॅट' हे फिचर वापरून तुमच्या फोनच्या ऍड्रेस बुक मध्ये समाविष्ट नसलेल्या अशा कोणाही व्यक्तीबरोबर तुम्ही गप्पा सुरु करू शकता. जर तुम्हाला त्या व्यक्तीचा फोन नंबर माहित असेल तर तुम्ही एक लिंक तयार करून त्या व्यक्तीबरोबर चॅट सुरु करू शकता. ही लिंक उघडल्यावर त्या व्यकीबरोबर चॅट आपोआपच उघडेल. 'क्लिक टू चॅट' हे तुमच्या फोन साठी आणि WhatsApp वेबसाठी देखील कार्य करते.
तुमची स्वतःची लिंक तयार करण्यासाठी https://wa.me/<number>
ही लिंक वापरा येथे <number>
हा त्या व्यक्तीचा फोन नंबर संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्वरूपात असणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय स्वरूपात फोन नंबर लिहिताना कोणतेही अतिरिक्त शून्य, कंस किंवा आडवी रेघ लावू नका. संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्वरूपात फोन नंबर कसा असावा याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. कृपया हे लक्षात घ्या की या फोन नंबर वर सक्रिय WhatsApp खाते असणे गरजेचे आहे.
वापरा : https://wa.me/15551234567
वापरू नका : https://wa.me/+001-(555)1234567
जर तुम्ही अगोदरपासूनच भरलेल्या ऐच्छिक संदेशाची लिंक तयार करू इच्छित असाल जो संदेश ऑटोमेटेडपणे गप्पांच्या टेक्स्ट फिल्ड मध्ये प्रदर्शित होईल, तसे करण्यासाठी https://api.whatsapp.com/send?phone=whatsappphonenumber&text=urlencodedtext
हे वापरा. यामध्ये whatsappphonenumber
हा संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्वरूपातील फोन नंबर असेल आणि URL-encodedtext
ही तुमच्या ऐच्छिक संदेशाची एनकोडेड URL असेल.
उदाहरण : https://wa.me/15551234567?text=I'm%20interested%20in%20your%20car%20for%20sale
तुमच्या अगोदरपासूनच भरलेल्या ऐच्छिक संदेशाची लिंक तयार करण्यासाठी https://wa.me/?text=urlencodedtext
हे वापरा.
उदाहरण : https://wa.me/?text=I'm%20inquiring%20about%20the%20apartment%20listing
लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या संपर्कांना संदेश पाठवू शकता त्याची यादी दिसेल.