तुमचा फोन नंबर पडताळून पाहणे
WhatsApp वापरणे सुरु करण्याअगोदर तुम्ही तुमचा नंबर पडताळून घेणे म्हणजेच सत्यापित करणे गरजेचे आहे.
तुमचा फोन नंबर पडताळून पाहण्यासाठी :
- WhatsApp उघडा.
- अटी आणि गोपनीयता धोरण वर प्रेस करून आमच्या 'सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरण' याविषयी वाचा.
- आमच्या सेवाशर्ती मान्य करण्यासाठी सहमत वर प्रेस करा.
- देश निवडा प्रेस करा.
- तुमचा देश शोधा किंवा देश निवडा प्रेस करा.
- तुमचा फोन नंबर एंटर करा.
- मदत वर प्रेस करून आमचे मदत केंद्र येथील लेख वाचा किंवा आमच्याशी संपर्क साधा प्रेस करा.
- एसएमएस द्वारे सत्यापन कोड प्राप्त करण्यासाठी पुढे > ठीक आहे वर प्रेस करा.
- एसएमएस मध्ये प्राप्त झालेला ६ अंकी कोड एंटर करा.
- जर तुम्हाला कोड प्राप्त झाला नसेल तर तुम्ही एसएमएस पुन्हा पाठवा किंवा मला कॉल करा प्रेस करा तसे केल्याने आमच्या ऑटोमेटेड सिस्टीमद्वारे तुम्हाला कोड सांगण्यासाठी कॉल केला जाईल.
- तुमचे नाव एंटर करा. कृपया लक्षात ठेवा :
- ग्रुपच्या नावाची मर्यादा २५ कॅरॅक्टर्स इतकी आहे.
- प्रोफाइल फोटो समाविष्ट करू शकता.
- पूर्ण झाले वर प्रेस करा.
टीप : ज्या WhatsApp वापरकर्त्यांकडे JioPhone किंवा JioPhone 2 आहे , अशांसाठीच खालील व्हिडिओ आहे.