संपर्क समाविष्ट करणे
तुम्ही WhatsApp मधून किंवा तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमधून संपर्क समाविष्ट करू शकता.
WhatsApp मधून संपर्क समाविष्ट करण्यासाठी :
- नवीन चॅट > पर्याय > नवीन संपर्क जोडा प्रेस करा.
- JioPhone किंवा JioPhone 2 असल्यास तुम्हाला तो संपर्क फोन मेमरी मध्ये सेव्ह करायचा आहे की सिम मेमरी मध्ये, हे निवडावे लागेल.
- संपर्काचे नाव आणि फोन नंबर एंटर करा > सेव्ह करा प्रेस करा.
- हे केल्यानंतर तो संपर्क तुमच्या संपर्क यादीमध्ये आपोआप दिसायला लागला पाहिजे. संपर्क अजूनही दिसत नसल्यास नवीन चॅट > पर्याय > संपर्क रीलोड करा प्रेस करा.
फोनच्या ॲड्रेस बुकमधून संपर्क समाविष्ट करण्यासाठी :
- ॲप्स मेनू मध्ये जाऊन संपर्क प्रेस करा.
- नवीन संपर्क किंवा नवीन दाबा.
- JioPhone किंवा JioPhone 2 असल्यास तुम्हाला तो संपर्क फोन मेमरी मध्ये सेव्ह करायचा आहे की सिम मेमरी मध्ये, हे निवडावे लागेल.
- संपर्काचे नाव आणि फोन नंबर एंटर करा > सेव्ह करा प्रेस करा.
- हे केल्यानंतर तो संपर्क तुमच्या WhatsApp संपर्क यादीमध्ये आपोआप दिसायला लागला पाहिजे. संपर्क अजूनही दिसत नसल्यास WhatsApp उघडा आणि नवीन चॅट > पर्याय > संपर्क रीलोड करा प्रेस करा.
टीप : एखादा संपर्क हटवायचा असल्यास तुम्हाला तो तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमधून हटवता येईल, पण WhatsApp मधून हटवता येणार नाही.