'तारांकित मेसेजेस' हे फीचर वापरून तुम्ही विशिष्ट मेसेजेसवर खूण करून ठेवू शकता. त्यामुळे तुम्ही ते मेसेजेस नंतर चटकन शोधू शकता.
मेसेज तारांकित करण्यासाठी
- WhatsApp उघडा.
- वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट मध्ये तुम्हाला जो मेसेज तारांकित करायचा आहे तो निवडा.
- पर्याय > तारांकित करा वर प्रेस करा.
मेसेजला अतारांकित करण्यासाठी
- WhatsApp उघडा.
- वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये तुम्हाला जो मेसेज अतारांकित करायचा आहे तो निवडा.
- पर्याय > अतारांकित करा वर प्रेस करा.
टीप: अतारांकित केल्याने तुमचा मेसेज काढून टाकला जात नाही.
तुम्ही तारांकित केलेल्या मेसेजेसची यादी बघण्यासाठी
- WhatsApp उघडा.
- सेटिंग्ज > तारांकित मेसेज वर प्रेस करा.