एकदाच पाहता येणाऱ्या मीडिया फाइल्स कशा पाठवाव्यात आणि उघडाव्यात
तुम्ही असा फोटो किंवा व्हिडिओ पाठवू शकता, जो प्राप्तकर्त्याने उघडल्यानंतर आणि प्राप्तकर्ता मीडिया व्ह्यूअरमधून बाहेर पडल्यानंतर WhatsApp वरून नाहीसा होईल. प्राप्तकर्ते मीडिया व्ह्यूअरमधून बाहेर पडल्यानंतर, त्या मीडिया फाइल्स त्या चॅटमध्ये दिसणार नाहीत आणि प्राप्तकर्ते त्या पुन्हा पाहू शकणार नाहीत. एकदाच पाहता येणारे फोटो आणि व्हिडिओ प्राप्तकर्त्याच्या फोटो किंवा गॅलरी मध्ये सेव्ह केले जाणार नाहीत आणि ते फॉरवर्ड करता येणार नाहीत.
एकदाच पाहता येणाऱ्या मीडिया फाइल्स पाठवणे
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
- + वर प्रेस करा.
- तुम्हाला जे पाठवायचे आहे ते निवडा आणि त्यानंतर हे करा:
- तुमचा कॅमेरा वापरून नवीन फोटो घेण्यासाठी किंवा तुमच्या लायब्ररीमध्ये आधीपासूनच असलेला फोटो निवडण्यासाठी फोटो वर प्रेस करा.
- तुमचा कॅमेरा वापरून नवीन व्हिडिओ घेण्यासाठी किंवा तुमच्या लायब्ररीमध्ये आधीपासूनच असलेला व्हिडिओ निवडण्यासाठी व्हिडिओ वर प्रेस करा.
- निवडा > पर्याय यावर प्रेस करा, त्यानंतर एकदाच पहा निवडा.
- पाठवा वर प्रेस करा.
प्राप्तकर्त्याने फोटो किंवा व्हिडिओ उघडल्यानंतर तुम्हाला चॅटमध्ये उघडलेले ही पावती दिसेल.
एकदाच पाहता येणाऱ्या मीडिया फाइल्स कशा उघडाव्यात
- 1
असलेला मेसेज उघडा. - फोटो किंवा व्हिडिओ पहा.
तुम्ही याआधीच पाहिलेल्या मीडिया फाइल्ससाठी तुम्हाला चॅटमध्ये उघडलेले ही पावती दिसेल. मीडिया व्ह्यूअरमधून बाहेर पडल्यानंतर तुम्ही मीडिया फाइल्स पुन्हा पाहू शकणार नाही किंवा त्यांविषयी काही समस्या असल्यास WhatsApp कडे त्यांची तक्रार करू शकणार नाही. तसेच, त्या तुमच्या कॅमेरा रोलमध्ये सेव्ह केल्या जाणार नाहीत.
संबंधित लेख:
- 'एकदाच पहा' विषयी
- पुढील प्लॅटफॉर्म्सवर एकदाच पाहता येणाऱ्या मीडिया फाइल्स कशा पाठवाव्यात आणि उघडाव्यात: Android | iPhone | वेब आणि डेस्कटॉप
- WhatsApp वर मेसेजेसची तक्रार कशी नोंदवावी