ग्रुपमध्ये सदस्य कसे जोडावेत आणि ग्रुपमधून सदस्य कसे काढावेत
तुम्ही ग्रुप ॲडमीन असल्यास तुम्ही ग्रुपमध्ये सदस्य जोडू शकता किंवा त्यांना काढू शकता.
सदस्य जोडणे
- WhatsApp मधील ग्रुपमध्ये जा. त्यानंतर, पर्याय > सदस्य जोडा यावर प्रेस करा.
- किंवा, तुमच्या चॅट लिस्टमधून ग्रुप निवडा. त्यानंतर पर्याय > ग्रुपची माहिती > सदस्य जोडा यावर प्रेस करा.
- तुम्हाला ज्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करायचे आहे, ते संपर्क शोधा किंवा निवडा.
- पूर्ण झाले वर प्रेस करा.
सदस्यांना काढणे
- WhatsApp ग्रुप चॅटमध्ये जा, त्यानंतर पर्याय > ग्रुपची माहिती यावर प्रेस करा.
- किंवा, तुमच्या चॅट लिस्टमधून ग्रुप निवडा. त्यानंतर मेनू > ग्रुपची माहिती यावर जा.
- ज्याला काढून टाकायचे आहे त्या सदस्यास निवडा.
- पर्याय > ग्रुपमधून काढून टाका > काढा वर प्रेस करा.