तुम्ही तुमचे खाते WhatsApp मधून हटवू शकता. खाते हटवणे ही एक अशी प्रक्रिया आहे जी मागे घेता येत नाही. तुमच्याकडून ते चुकून झाले असले तरी आम्ही त्याबद्दल काही करू शकत नाही.
तुमचे WhatsApp खाते हटवण्यासाठी:
- पर्याय > सेटिंग्ज > खाते > माझे खाते हटवा यावर प्रेस करा.
- तुमचा कंट्री कोड निवडा आणि फोन नंबर एंटर करा.
- हटवा > हटवा वर प्रेस करा.
खाते हटवल्याने हे होईल:
- तुमचे खाते WhatsApp मधून काढून टाकले जाईल.
- तुमचे पूर्वीचे चॅट हटवले जाईल.
- तुम्हाला तुमच्या सर्व WhatsApp ग्रुप्समधून काढून टाकले जाईल.
तुमचे खाते हटवल्यावर:
- तुम्ही तुमचे खाते पुन्हा वापरू शकणार नाही.
- तुमची WhatsApp माहिती हटवण्याची प्रक्रिया सुरु होऊन ती पूर्ण होण्यासाठी नव्वद दिवसांचा कालावधी लागू शकतो. तांत्रिक अडचणी, सॉफ्टवेअरमधील त्रुटी किंवा डेटा नष्ट होणे अशा काही कारणांमुळे नव्वद दिवसांनंतरही तुमचा डेटा बॅकअप स्टोरेजमध्ये राखून ठेवला जाऊ शकतो. या काळात तुमची माहिती WhatsApp वर तुमच्यासाठी उपलब्ध नसते.
- तुम्ही तयार केलेल्या ग्रुपशी संबंधित माहितीवर किंवा इतर वापरकर्त्यांकडे तुम्ही त्यांना पाठवलेल्या मेसेजेसची कॉपी यासारख्या तुमच्याशी संबंधित असलेल्या माहितीवर याचा परिणाम होत नाही.
- लॉग रेकॉर्ड्ससारख्या काही गोष्टींची प्रत आमच्या डेटाबेसमध्ये राहील, परंतु त्यामध्ये वैयक्तिक माहिती नसेल.
- कायदेशीर समस्या, अटींचे उल्लंघन या कारणांसाठी किंवा हानीस प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने आम्ही तुमची माहिती जतन करून ठेवू शकतो.
- याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या गोपनीयता धोरणामधील कायदा आणि सुरक्षा हा विभाग पहा.
- इतर Facebook Companies सोबत शेअर केलेली तुमची माहितीदेखील हटवली जाईल.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर तुमचे खाते कसे हटवावे हे जाणून घ्या: Android | iPhone