तुमचे कोणते मित्र WhatsApp वापरतात ते WhatsApp ला सहज शोधता येते. WhatsApp आपोआप तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुक मधून त्या संपर्काचे फोन नंबर आपोआप WhatsApp च्या संपर्क यादीमध्ये समाविष्ट करते.
नवीन संपर्क समाविष्ट करणे
- तुमच्या संपर्कांचे नाव आणि फोन नंबर तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुक मध्ये समाविष्ट करा.
- जर तो स्थानिक नंबर असेल तर : तुम्ही कॉल करताना ज्या प्रकारे नंबर लावता त्या प्रमाणे तो जतन करा.
- जर तो आंतरराष्ट्रीय नंबर असेल तर : तो नंबर संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्वरूपात जतन करा :
- + [कंट्री कोड] [संपूर्ण फोन नंबर].
- फोन नंबरच्या सुरुवातीला कोणतेही शून्य लावू नका.
- WhatsApp चालू करा आणि गप्पा टॅब वर जा.
- नवीन गप्पा
चिन्ह > मेनू बटण > रिफ्रेश वर टॅप करा.
समस्यांचे निराकरण
जर तुम्हाला तुमचे संपर्क दिसत नसतील :
- सेटिंग्ज अॅप मध्ये तुम्ही WhatsApp ला तुमच्या फोनमधील संपर्क वापरण्याची अनुमती दिलेली आहे का याची खात्री करून घ्या.
- तुमच्या फोनच्या अॅड्रेस बुक मध्ये सर्व खाते आणि गट हे "दृष्य" किंवा "दृष्यमान" वर सेट केलेले आहेत ना हे तपासा.
यांवर संपर्क कसे समाविष्ट करायचे ते पहा येथे :iPhone | Windows Phone