ग्रुप व्हिडिओ कॉल कसा करावा
WhatsApp मधील 'ग्रुप कॉलिंग' वापरून एकावेळी कमाल आठ सदस्यांसोबत ग्रुप व्हिडिओ कॉल करता येतो. तुम्हाला कोणातरी व्हिडिओ कॉल करते, तेव्हा इनकमिंग ग्रुप व्हिडिओ कॉल नोटिफिकेशन किंवा WhatsApp ग्रुप व्हिडिओ कॉल स्क्रीनवर सध्या कॉलवर असलेले सदस्य दिसतील. ज्या सदस्याने तुम्हाला कॉलमध्ये समाविष्ट केले, त्याचे नाव सर्वात वर दिसेल. तुमच्याकडून मिस झालेला कॉल अद्याप सुरू असल्यास तुम्ही त्या कॉलमध्येही सामील होऊ शकता.
ग्रुप व्हिडिओ कॉल करणे
ग्रुप चॅटमधून ग्रुप व्हिडिओ कॉल करणे
- तुम्हाला ज्या ग्रुपला व्हिडिओ कॉल करायचा आहे त्या ग्रुपच्या चॅटवर जा.
- तुमच्या ग्रुपमध्ये ३३ किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असल्यास, ग्रुप कॉल
वर टॅप करा. - तुमच्या ग्रुपमध्ये ३२ किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असल्यास, व्हिडिओ कॉल
वर टॅप करा आणि तुमचा निर्णय कन्फर्म करा. जे सात सदस्य सर्वात आधी उत्तर देतील ते कॉलमध्ये सामील होऊ शकतात आणि फक्त ग्रुपचे सदस्यच कॉलमध्ये सहभागी होऊ शकतात. - तुम्हाला ज्या संपर्कांना व्हिडिओ कॉलमध्ये जोडायचे आहे ते संपर्क शोधा आणि व्हिडिओ कॉल
वर टॅप करा.
‘कॉल्स’ टॅबमधून ग्रुप व्हिडिओ कॉल करणे
- WhatsApp उघडा आणि कॉल्स टॅबवर टॅप करा.
- नवीन कॉल
> नवीन ग्रुप कॉल यावर टॅप करा. - तुम्हाला ज्या संपर्कांना व्हिडिओ कॉलमध्ये जोडायचे आहे ते संपर्क शोधा आणि व्हिडिओ कॉल
वर टॅप करा.
वैयक्तिक चॅटमधून ग्रुप व्हिडिओ कॉल करणे
- तुम्हाला ज्या संपर्कांना व्हिडिओ कॉल करायचा आहे, त्यापैकी एका संपर्कासोबत WhatsApp चॅट सुरू करा.
- व्हिडिओ कॉल
वर टॅप करा. - संपर्काने तुमचा कॉल स्वीकारल्यानंतर, उघडा
> सदस्य जोडा वर टॅप करा. - तुम्हाला आणखी ज्या संपर्कांना व्हिडिओ कॉलमध्ये समाविष्ट करायचे आहे ते संपर्क शोधा आणि जोडा वर टॅप करा.
- आणखी संपर्कांना समाविष्ट करायचे असल्यास, सदस्य जोडा
वर टॅप करा.
ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये सामील होणे
इनकमिंग ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये सामील होणे
- एखादी व्यक्ती तुम्हाला ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये येण्याचे आमंत्रण देते तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.
- कॉल तपशिलांची स्क्रीन उघडण्यासाठी नोटिफिकेशनवर टॅप करा.
- या स्क्रीनवरून, तुम्ही कॉलमधील सहभागी सदस्य आणि इतर आमंत्रित व्यक्ती पाहू शकता.
- कॉलमध्ये सामील होण्यासाठी सामील व्हा वर टॅप करा.
- कॉलवर असताना, उघडा
वर टॅप करा आणि कॉल माहितीची स्क्रीन उघडा. - कॉलमध्ये आणखी संपर्कांना जोडण्यासाठी सदस्य जोडा वर टॅप करा.
- आधीपासून आमंत्रित केलेल्या लोकांना नोटिफिकेशन पाठवण्यासाठी रिंग करा वर टॅप करा.
मिस्ड ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये सामील होणे
- WhatsApp उघडा आणि कॉल्स टॅबवर टॅप करा.
- ग्रुप चॅटमधून कॉल सुरू झालेला असल्यास, तुम्ही ते चॅट उघडून आणि सामील व्हा वर टॅप करून कॉलमध्ये सामील होऊ शकता.
- कॉल सुरू असल्यास, तुम्हाला सामील व्हायचे आहे त्या कॉलवर टॅप करा. हे केल्यास कॉल माहितीची स्क्रीन उघडेल.
- सामील व्हा वर टॅप करा.
- एका कॉलवर एकावेळी फक्त आठ सदस्य सक्रिय राहू शकतात.
- ग्रुप व्हिडिओ कॉल करत असताना किंवा तो घेताना, तुमच्याकडे आणि तुमच्या संपर्कांकडे उत्तम इंटरनेट कनेक्शन आहे याची खात्री करा. एखाद्या संपर्काकडील कनेक्शन खराब असेल, तर त्यानुसार व्हिडिओ कॉलची गुणवत्तादेखील बदलेल.
- ग्रुप व्हिडिओ कॉलदरम्यान तुमच्याकडे व्हिडिओ बंद करा
वर टॅप करून तुमचा व्हिडिओ बंद करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. - ग्रुप व्हिडिओ कॉल सुरू असताना तुम्हाला कोणत्याही संपर्काला काढता येणार नाही. एखाद्या संपर्काने कॉल समाप्त केला, तरच तो कॉलमधून डिस्कनेक्ट होईल.
- तुम्ही ब्लॉक केलेला एखादा संपर्क तुमच्यासोबत ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये आहे असे होऊ शकते. पण लक्षात घ्या, की तुम्ही ब्लॉक केलेल्या संपर्कास किंवा ज्या संपर्काने तुम्हाला ब्लॉक केले आहे त्या संपर्कास तुम्ही कॉलमध्ये समाविष्ट करू शकणार नाही.