WhatsApp खाते तयार करण्यासाठी तुमच्याकडे सक्रिय फोन नंबर असणे गरजेचे आहे. तुम्हाला पडताळणी प्रक्रियेमध्ये अडचणी येत असतील तर खालील गोष्टींची खात्री करुन घ्या:
तुमचा फोन नंबर एंटर केल्यानंतर कृपया तुमच्या फोनवर एसएमएस येण्याची प्रतीक्षा करा. या एसएमएसमध्ये ६ अंकी पडताळणी कोड असेल, जो तुम्ही WhatsApp मधील पडताळणी स्क्रीनवर एंटर करू शकता. पडताळणी कोड हा युनिक असतो आणि तुम्ही जेव्हा केव्हा फोन नंबर किंवा डिव्हाइस बदलून त्याची पडताळणी करता तेव्हा प्रत्येक वेळी तो बदलतो. कृपया, पडताळणी कोड अंदाजाने ओळखण्याचा प्रयत्न करू नका. चुकीचे कोड एंटर केल्यास तुम्हाला ठरावीक काळासाठी पडताळणी प्रक्रियेमधून लॉक आउट केले जाईल.
टीप: तुमच्याकडे iCloud Keychain चालू केलेले असल्यास आणि या नंबरची पूर्वी पडताळणी केली असल्यास, तुम्हाला नवीन एसएमएस कोड न मिळता तुमची आपोआप पडताळणी होईल.
तुम्हाला एसएमएसद्वारे कोड मिळाला नसेल तर, आमची ऑटोमेटेड सिस्टीम तुम्हाला तुमचा कोड कळवण्यासाठी कॉल करेल. कृपया काउंट डाऊन संपेपर्यंत पाच मिनिटे प्रतीक्षा करा आणि या काळात तुमचा नंबर बदलू नका. पाच मिनिटे प्रतीक्षा केल्यानंतर मला कॉल करा वर टॅप करा.
टीप: तुमच्या कॅरिअरनुसार तुम्हाला एसएमएस किंवा फोन कॉलसाठी शुल्क लागू शकते.
जर तुम्ही वरील सर्व उपाय करून बघितले असतील आणि तरीदेखील तुम्हाला कोड मिळाला नसेल तर, कृपया खालील उपाय करून बघा: